कोलकाता येथील श्री दुर्गादेवी मंडप व्हॅटिकन सिटीप्रमाणे सजवला !

  • येशू ख्रिस्त आणि मेरी यांच्या मध्ये बसवली श्री दुर्गादेवीची मूर्ती !

  • सामाजिक माध्यमांतून हिंदूंचा विरोध !

कोलकाता (बंगाल) – येथील श्रीभूमी दुर्गा पूजा मंडपामध्ये यावर्षी नवरात्रोत्सवानिमित्त व्हॅटिकन सिटीप्रमाणे रचना करण्यात आली आहे. बाहेरून हा मंडप एखाद्या चर्चसारखा वाटत आहे. आतमध्ये येशू ख्रिस्त आणि मेरी यांची चित्रे लावण्यात आली आहेत. या दोघांमध्ये श्री दुर्गादेवीची मूर्ती ठेवण्यात आली आहे.

सामाजिक माध्यमांतून या मंडपाची छायाचित्रे प्रसारित झाल्यानंतर अनेक हिंदूंकडून टीका होऊ लागली आहे. ‘हे काहीच नाही. थोडे दिवस थांबा. कदाचित् मुसलमानांच्या काबा प्रमाणेही मंडप सजवण्यात येईल आणि चंडीपाठच्या ऐवजी अजान ऐकायला मिळेल. श्री दुर्गादेवीला हिजाब घालायालाही हे लोक कमी करणार नाहीत. जेव्हा बंगालचा विषय येतो, तेव्हा तेथे असे काही होऊ शकते. यात आश्‍चर्य वाटण्यासारखे काही नाही’, अशी एकाने टीका केली आहे.

संपादकीय भूमिका

हिंदूंना धर्मशिक्षण नसल्याने ते सर्वधर्मसमभावाच्या नावाखाली अशा प्रकारे कृत्य करतात; मात्र अन्य धर्मीय कधीही सर्वधर्मसमभाव म्हणून त्यांच्या धार्मिक स्थळी हिंदूंच्या देवतांच्या मूर्ती किंवा धार्मिक कृती कधी करत नाहीत, हे लक्षात घ्या !