उत्तरप्रदेशमध्ये मुसलमान तरुणांकडून ३ हिंदु बहिणींवर मदरशात शिकण्यासाठी दबाव

प्रतीकात्मक छायाचित्र

लक्ष्मणपुरी – उत्तरप्रदेशातील उन्नाव जिल्ह्यातील खेडा गावात मुसलमान तरुणांकडून छळ झाल्याने हिंदु समाजातील ३ अल्पवयीन बहिणींनी शिक्षण सोडल्याची घटना समोर आली आहे. या तिन्ही हिंदु बहिणींवर मदरशात शिकण्यासाठी दबाव आणला जात होता, असा आरोप आहे. इस्लामनुसार वेशभूषा करण्याचीही त्यांच्यावर सक्ती आणली जात होती. त्यांना अपहरण करून विनयभंग करण्याविषयी धमकावले जात होते. त्यांना गलिच्छ संदेश पाठवले जात होते, असा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवून ६ मुसलमानांना कह्यात घेतले आहे. (भाजपशासित उत्तरप्रदेशमध्ये मुसलमानांची ही दडपशाही हिंदूंना अपेक्षित नाही ! – संपादक)

१. पीडित मुलींच्या वडिलांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, ‘गेल्या ४ वर्षांपासून मुसलमान समाजातील ७-८ मुले माझ्या मुलींना त्रास देतात. त्यांनी मुलींच्या भ्रमणभाषवर अश्‍लील संदेश पाठवले आहेत.

२. हे तरुण प्रतिदिन मुलींना रस्त्यात अडवून ‘मुसलमानाप्रमाणे ‘वेशभूषा करा’, ‘मदरशात शिकायला जा’. असे केले नाही, तर घरातून उचलून नेऊ’, अशा धमक्या देत होते. (अशा धमक्या द्यायला उत्तरप्रदेश भारतात आहे कि पाकिस्तानात ? – संपादक) या तिन्ही बहिणी अकरावी, आठवी आणि सहावी या वर्गांत शिकत होत्या.

संपादकीय भूमिका

हिंदू बहुसंख्य असणार्‍या देशात अशा प्रकारचा दबाव हिंदु मुलींवर आणला जातो, हे लज्जास्पद ! मुसलमान किती उद्दाम झाले आहेत, हेच यातून दिसून येते !