विहिंपचे मुंबई क्षेत्र मंत्री शंकर गायकर यांनी केली  साधूंना मारहाण करणार्‍या आरोपींना शिक्षा देण्याची मागणी !

पिंपरी (पुणे) – सांगली जिल्ह्यामध्ये जत तालुक्यातील लवंगा उमदी येथे ४ साधूंना ‘मॉब लिंचींग’ करून अतिशय निर्घृणपणे मारहाण करण्यात आली. साधूंना मारहाण करणार्‍या आरोपींना कठोर शिक्षा करावी, अशी मागणी करतांनाच शासनाने हिंदु समाजाच्या सहनशक्तीची परीक्षा बघणे बंद करावे, अशी चेतावणी विश्व हिंदु परिषदेचे मुंबई क्षेत्र मंत्री शंकर गायकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

ही घटना पालघर साधूंच्या हत्याकांडाशी साधर्म्य दर्शवणारी आहे. चोर्‍या करणारी टोळी ही केवळ हिंदु साधूंमध्येच कशी दिसते ? या घटनेचा आणि अशा सर्व षड्यंत्रांचा विश्व हिंदु परिषद तीव्र शब्दात निषेध करते, असेही पत्रकामध्ये नमूद केले आहे.