जळगाव येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांचे निलंबन !

मराठा समाजाविषयी अपशब्द उच्चारल्याचे प्रकरण

किरणकुमार बकाले

जळगाव – येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी मराठा समाजाविषयी अपशब्द उच्चारल्याच्या प्रकरणी त्यांना निलंबित करण्यात आले आहे. जळगावचे पोलीस अधीक्षक प्रवीण मुंढे यांनी या प्रकरणावरून धमकी देणार्‍यांनाही शांततेचे आवाहन केले आहे. ‘‘कायदा-सुव्यवस्थेला बाधा होऊ शकते, असे कोणतेही कार्य करू नये’’, असेही ते म्हणाले.

‘पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील नेमणुकीत असलेल्या एका पोलीस अंमलदारासमवेत विशिष्ट समाजाविषयी अत्यंत आक्षेपार्ह, घृणास्पद, निंदनीय आणि विशिष्ट समाजाच्या भावना भडकावणारे संभाषण केल्याचे ध्वनीमुद्रण प्रसारित झाले आहे.