श्रीनगरमध्ये २ आतंकवादी ठार

श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – श्रीनगरमधील नौगाम भागात सुरक्षादल आणि आतंकवादी यांच्यातील चकमकीमध्ये आतापर्यंत दोघा आतंकवाद्यांना ठार करण्यात आले आहे. ही चकमक सायंकाळी उशिरापर्यंत चालू होती. पुलवामा येथील एजाज रसूल नजर आणि शाहिद अहमद अशी ठार झालेल्या आतंकवाद्यांची नावे आहेत. ते अन्सार गजवत-उल्-हिंद या आतंकवादी संघटनेशी संबंधित होते. २ सप्टेंबरला पुलवामा येथे बंगालमधील मुनीर उल् इस्लाम या कामगाराच्या हत्येमध्ये हे दोन्ही आतंकवादी सहभागी होते.

संपादकीय भूमिका

केवळ आतंकवाद्यांना ठार केल्याने काश्मीरमधील जिहादी आतंकवाद नष्ट होणार नाही, तर त्यासाठी काश्मिरींमधील जिहादी मानसिकता आणि आतंकवाद्यांचा निर्माता पाकला नष्ट करण्याची आवश्यकता आहे !