रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्यावर प्राणघातक आक्रमण : थोडक्यात बचावले

 व्लादिमीर पुतिन

मॉस्को – रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये युद्ध चालू असतांनाच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यावर प्राणघातक आक्रमण झाले आहे. ‘युरो वीकली न्यूज’ने पुतिन याविषयी वृत्त दिले आहे. ‘या आक्रमणात ते थोडक्यात बचावले’, असे या वृत्त अहवालात म्हटले आहे.
या अहवालानुसार पुतिन त्यांच्या अधिकृत निवासस्थानी परतत होते.

या वेळी त्यांच्या सुरक्षा पथकातील पहिली गाडी एका रुग्णवाहिकेने थांबवली. गाडी थांबवल्यानंतर पुतिन यांच्या गाडीच्या डाव्या चाकात मोठा स्फोट झाला. यानंतर सर्वत्र धुराचे लोट पसरले; मात्र तोपर्यंत पोलीस सतर्क झाले आणि त्यांनी पुतिन यांना सुरक्षित ठिकाणी  हालवले. या घटनेत पुतिन यांचा जीव थोडक्यात बचावला. या प्रकरणी पुतिन यांच्या सुरक्षा सेवेतील अनेकांना अटक करण्यात आली आहे.