पाकमध्ये आलेल्या पुरामुळे तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. जेव्हा एखादी बिकट परिस्थिती समाजावर कोसळते, तेव्हा समाजातील सर्वच घटक त्यांच्यातील ताण-तणाव किंवा रुसवे-फुगवे विसरून संघटित होतात आणि परिस्थितीला धैर्याने सामोरे जातात. पाकमध्ये मात्र असे होतांना दिसत नाही. एवढी मोठी नैसर्गिक आपत्ती आल्यावरही तेथील समाज स्वतःची धर्मांध मनोवृत्ती त्यागायला सिद्ध नाही. याचे अलीकडचे उदाहरण म्हणजे पाकमधील सिंध प्रांतात पूरग्रस्तांसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यात आले होते. या केंद्रात हिंदूंनीही आश्रय घेतला होता; मात्र तेथील लोकांनी हिंदूंना केंद्रातून हाकलून लावले. पाकमध्ये हिंदूंवर होणार्या अत्याचारांना सीमा नाही; मात्र या नैसर्गिक आपत्तीमुळे तेथील मुसलमानांच्या हृदयाला पाझर फुटून त्यांच्यातील माणूसकी जागृत होईल’, असे हिंदूंना वाटले होते; मात्र ही आशा फोल ठरली. महत्त्वाचे म्हणजे तेथील मुसलमानांची ही हीन मनोवृत्ती जगासमोर आणण्याचा प्रयत्न करणारे पत्रकार नसरल्लाह गद्दानी यांना पोलिसांनी कारागृहात डांबले. याचा अर्थ ‘आमच्या धर्मांध मनोवृत्तीविषयी कुणी बोलायचे नाही. जे बोलतील, त्यांना आयुष्यातून उठवले जाईल’, अशी धर्मांधांची मनोवृत्ती दिसून येते. या आपत्तीमुळे धर्मांधांची धर्मांधता आणि पाशवी वृत्ती अधिकच वाढली, असे दिसून आले. काही दिवसांपूर्वी पूरग्रस्तांना शिधा देण्याच्या नावाखाली एका अल्पवयीन हिंदु मुलीला आमीष दाखवून तिच्यावर बलात्कार करण्यात आला. मागील वर्षी पाकमध्ये आलेल्या पुराच्या वेळी तेथील अनेक स्वयंसेवी संघटनांनी पूरग्रस्तांना साहाय्य केले; मात्र अनेक संस्थांनी हिंदूंना ‘ते हिंदु आहेत’ या एकमेव कारणामुळे साहाय्य करण्यास नाकारले.
ही झाली तेथील मुसलमानांची मानसिकता. पाकमधील हिंदू मात्र मुसलमानांनी केलेला अन्याय आणि अत्याचार विसरून त्यांना जमेल तसे साहाय्य करत आहेत. बलुचिस्तान प्रांतातील कच्छी जिल्ह्यातील जलाल खान गावातील १०० खोल्यांच्या बाबा माधोदास मंदिराच्या व्यवस्थापनाने २०० ते ३०० पूरग्रस्तांसाठी अन्न, पाणी आणि निवारा दिला आहे. यातून हिंदू आणि धर्मांध मुसलमान यांच्या मानसिकतेतील भेद दिसून येतो. जो समूह गेली कित्येक शतके हिंदूंच्या कित्येक पिढ्यांवर अत्याचार करत आहे, त्यांना साहाय्य करण्याचा विचार पाकमधील हिंदूंच्या मनात येतो. यातून त्यांच्यातील सहिष्णुता आणि माणूसकी दिसून येते; मात्र या सहिष्णुतेची किंमत हिंदूंना मोठ्या प्रमाणात चुकवावी लागत आहे. महत्त्वाचे म्हणजे याला ‘हिंदूंची सहिष्णुता म्हणायची कि गांधीगिरी ?’, हा वेगळा प्रश्न आहेच. पाकमधील पुराविषयी बर्याच बातम्या प्रसारित झाल्या; मात्र पुराच्या कालावधीमध्ये तेथील धर्मांध मुसलमानांनी दाखवलेल्या माणूसकीशून्य वर्तनाविषयी कुणी बोलण्यास धजावले नाही. पाकमधील विस्कळीत झालेले जनजीवन पूर्वपदावर येईल; मात्र या काळात धर्मांधांच्या पाशवी वागणुकीमुळे हिंदूंच्या मनावर झालेल्या जखमांचे काय ? भारत सरकार तेथील हिंदूंसाठी काय करणार आहे ?
‘माणूसकीशून्य आणि अत्याचारी धर्मांधांना संकटकाळात साहाय्य करायचे का ?’, हे हिंदूंनी आता ठरवायला हवे ! |