(म्हणे) ‘जोपर्यंत तुम्ही हिंदु आहात तोपर्यंत तुम्ही क्षुद्र आहात !’

द्रविड मुन्नेत्र कळघम् (द्रविड प्रगती संघ) पक्षाचे नेते  ए. राजा यांचे विद्वेषी विधान !

द्रमुक पक्षाचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री ए. राजा (डावीकडे) भाजपचे प्रदेशाध्यक्ष अण्णामलाई (उजवीकडे)

चेन्नई (तमिळनाडू) – द्रविड मुन्नेत्र कळघम् (द्रविड प्रगती संघ) पक्षाचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री ए. राजा यांनी एका सभेमध्ये ‘जोपर्यंत तुम्ही हिंदु आहात तोपर्यंत तुम्ही क्षुद्र आहात. तुम्ही हिंदु असेपर्यंत दलित आहात. जोपर्यंत तुम्ही हिंदु आहात तोपर्यंत तुम्ही अस्पृश्य आहात. तुमच्यापैकी कुणी वेश्यांच्या मुलांसमवेत राहू इच्छिता का ? तुमच्या पैकी किती जण अस्पृश्य राहू इच्छिता ?’ अशी विधाने केली आहेत. भाजपच्या त्यांच्यावर टीका केली आहे.

१. ए. राजा यांनी पुढे म्हटले की, मी असा धर्म नाही पाहिला ज्यात कर्नाटकातील लिंगायत सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका प्रविष्ट करून म्हणतात, ‘आमची पूजा करण्याची पद्धत आणि सिद्धांत वेगळा आहे.’ लिंगायत स्वतःला ‘हिंदु’ घोषित करू नये, अशी मागणी करत आहेत; परंतु सर्वोच्च न्यायालय काय म्हणत आहे ? न्यायालय म्हणते, ‘तुम्ही मुसलमान, ख्रिस्ती किंवा फारसी नाहीत, तर तुम्ही हिंदू असले पाहिजे.’ कोणत्या देशामध्ये अशी अमानुषता आहे का ? (सर्वोच्च न्यायालयावर असे विधान करणार्‍या ए. राजा यांच्यावर अवमान केल्याचा गुन्हा नोंद करून त्यांना कारागृहात डांबण्याचे धाडस राज्यातील सत्ताधारी द्रमुक करील का ? – संपादक)

२. ए. राजा यांच्यावर टीका करतांना तमिळनाडूचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष अण्णामलाई यांनी ट्वीट करून म्हटले की, राज्यातील अशा राजकीय स्थितीविषयी आम्हाला खंत आहे. द्रमुकच्या खासदारांनी एका धर्माविषयी द्वेष पसरवला आहे. याचा एकमात्र उद्देश दुसर्‍यांना खुश करण्याचा आहे. या राजकीय नेत्यांना असे वाटते की, ते तमिळनाडूचे मालक आहेत.

संपादकीय भूमिका

  • हिंदु सहिष्णु असल्याने ए. राजा यांच्यासारखे नास्तिकतावादी अशा प्रकारचे विधान करू धजावतात. अन्य धर्मियांविषयी अशा प्रकारचे विधान केले, तर त्यांना शिरच्छेद करण्यासारख्या धमकी मिळतील. त्यामुळे ते मौन बाळगतात !
  • तमिळनाडू आणि केरळ या राज्यांत ख्रिस्ती धर्मांत प्रवेश केलेल्या मागासवर्गीय हिंदूंना दफन करण्यासाठी ख्रिस्त्यांची दफनभूमी उपलब्ध करून दिली जात नाही. मुसलमानांमधील शिया-सुन्नी यांच्यात वारंवार होणार रक्तपात सर्वश्रुत आहे. हिंदु धर्मात नसणार्‍या गोष्टींविषयी बोलून त्याची अपकीर्ती करणार्‍यांनी याविषयी बोलावे !