मुसलमानांना गरब्यामध्ये सहभागी व्हायचे असेल, तर मूर्तीपूजा मान्य करा !

मध्यप्रदेशच्या सांस्कृतिक मंत्री उषा ठाकूर यांची अट !

मध्यप्रदेशच्या सांस्कृतिक मंत्री उषा ठाकूर

भोपाळ (मध्यप्रदेश) – ज्या मुसलमानांना स्वतःच्या धर्माचा कंटाळा आला आहे, जे मूर्तीपूजा मान्य करतील, तसेच ज्यांना नवरात्रोत्सवामध्ये गरबा आणि दांडिया खेळायचा आहे, त्यांना गरबा कार्यक्रमामध्ये प्रवेश दिला जाईल. येतांना ओळखपत्रासमवेत आई, पत्नी, मुलगी यांना समवेत आणावे, अशी अट सांस्कृतिक मंत्री उषा ठाकूर यांनी घातली आहे. मध्यप्रदेशातील सर्व जिल्हाधिकार्‍यांना त्यांनी याविषयी पत्रही पाठवले आहे. हिंदूंच्या संघटनांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे, तर अनेकांनी हे धार्मिक द्वेष पसरवण्याचे कारस्थान असल्याचे म्हटले आहे.
मध्यप्रदेशातील भोपाळ, इंदूर, जबलपूर, ग्वाल्हेर आदी शहरांमध्ये मोठ्या संख्येने गरब्याचे कार्यक्रम आयोजित केले जातात. यामध्ये मुसलमान तरुण ओळख लपवून प्रवेश करतात आणि हिंदु मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढतात, असे समोर आल्यामुळेच ठाकूर यांनी हा निर्णय घेतल्याचे म्हटले जात आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी ‘गरबा मंडप हे लव्ह जिहादचे माध्यम बनले आहे’, असे विधान केले होते.

कुराण अनुमती देत असेल, तर त्यांनी सहभागी व्हावे ! – उमा भारती

मध्यप्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मुख्यमंत्री उमा भारती यांनी म्हटले होते की, जे लोक ‘जय माताजी’ म्हणणार नाहीत, त्यांना गरब्याच्या ठिकाणी प्रदेश दिला जाऊ नये. नवरात्रीमध्ये शक्तीच्या देवीची पूजा केली जाते. जर मूर्तीपूजनावर मुसलमानांची श्रद्धा आहे, तर त्यांचे या कार्यक्रमात स्वागत आहे. जर कुराण आणि अन्य कोणतेही धर्मशास्त्र त्यांना अनुमती देत असेल, तर ते कार्यक्रमात सहभागी होऊ शकतात. केवळ मनोरंजन म्हणून येऊ नये.

संपादकीय भूमिका

अशी अट संपूर्ण देशभरातील सरकारांनी घातली पाहिजे, असेच धर्मप्रेमी हिंदूंना वाटते !