पाकमध्ये पूरग्रस्त ३०० मुसलमानांना हिंदूंनी दिला मंदिरात आसरा !

क्वेटा (पाकिस्तान) – गेल्या काही आठवड्यांपासून पाकिस्तान पुरामुळे त्रस्त झाला आहे. स्थानिक नागरिक साहाय्यासाठी हाक मारत आहेत. बलुचिस्तान प्रांतातील कच्छी जिल्ह्यातील जलाल खान गावातील १०० खोल्यांच्या बाबा माधोदास मंदिराने २०० ते ३०० पूरग्रस्तांसाठी अन्न, पाणी आणि निवारा दिला आहे. यात बहुतांश मुसलमानांचा समावेश आहे. तसेच मुक्या प्राण्यांना आसरा दिला आहे. बाबा माधोदास एक हिंदु संत होते. त्यांच्यावर या भागातील हिंदु आणि मुसलमान यांची श्रद्धा होती.

संपादकीय भूमिका

पाकमधील पुरामध्ये हिंदूंचीही हानी झाली आहे. त्यातील किती हिंदूंना मुसलमानांनी त्यांच्या मशिदीत आसरा दिला आहे, हेही शोधायला हवे ! उलट काही धर्मांधांनी धान्य देण्याचे आमीष दाखवून एका ८ वर्षांच्या हिंदु मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे ! यातून त्यांची खरी मानसिकता लक्षात येते !