मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई झालेल्या आरोपीची कळंबा कारागृहात आत्महत्या !

कोल्हापूर – मोक्का अंतर्गत गुन्हा नोंद असलेला भरत घसघसे या बंदीवानाने कळंबा कारागृहात गळफास लावून आत्महत्या केली. कळंबा कारागृहाचे वरिष्ठ अधिकारी यांच्यासह राजवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक दत्तात्रय नाळे, साहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप जाधव यांनी घटनास्थळाची पहाणी करून मृतदेह शासकीय रुग्णालयात हलवण्यात आला.

मारामारीसह अवैध शस्त्रे बाळगल्याप्रकरणी घसघसेविरुद्ध ईश्वरपूर पोलीस ठाणे येथे गंभीर गुन्हे नोंद आहेत. वर्ष २०१९ मध्ये घसघसेसह त्याच्या ६ सहकार्‍यांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली होती.