त्रिकालज्ञानी, सच्चिदानंद परब्रह्म, अवधूतस्वरूपा, तव चरणी शरणागतीने लोटांगण ।

सर्व साधकांचा आधार असलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘१३.८.२०२२ या दिवशी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये ‘कै. (सौ.) प्रमिला केसरकरकाकू आणि कै. (सौ.) शालिनी मराठेकाकू संत झाल्या’, ही आनंदवार्ता वाचल्यावर माझ्या मनात गुरुदेवांविषयी अपार कृतज्ञता दाटून आली. त्यातून हे समष्टीचे आत्मनिवेदन स्वरूप काव्य गुरुदेवांनीच (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनीच) माझ्याकडून टंकलिखित करून घेतले. ते त्यांच्या सुकोमल चरणी शरणागत आणि कृतज्ञताभावाने समर्पित करतो.


नित्य तुझी (टीप) कृपादृष्टी साधकांवर असते ।
सूक्ष्म परीक्षणाद्वारे साधकांच्या प्रगतीचे गणित मांडते ।। १ ।।

श्री. संजय घाटगे

सूक्ष्म दृष्टी तुमची सहजपणे सप्तलोक
आणि सप्तपाताळातही वेध घेते ।
महा, जन, तप लोकांत नवीन
येणार्‍या साधकांची नित्य नोंद ठेवते ।। २ ।।

कै. (सौ.) प्रमिला केसरकर आणि
कै. (सौ.) शालिनी मराठे यांना ।
संत घोषित करून, दिली पुन्हा
तुम्ही तुमच्या द्रष्टेपणाची साक्ष ।। ३ ।।

शोधक आपली दृष्टी अनंत ब्रह्मांडे न्याहाळते ।
याचेच प्रत्यंतर आज पुन्हा साधकांना आले ।। ४ ।।

या अद्भुत अन् दुर्लभ वार्तेने साधक
झाले अंतर्मुख आणि भावविभोर ।
हे त्रिकालज्ञानी, सच्चिदानंद परब्रह्मा,
अवधूतस्वरूपा, तव चरणी शरणागतीने लोटांगण ।। ५ ।।

‘देह सुटता साधना करणे कठीण’,
हे या दोन संत मातांनी खोटे ठरवले ।
‘गुरुकृपा असता काहीही अशक्य नाही’,
हे साधकांच्या मनी बिंबवले ।। ६ ।।

मृत्यूनंतरही गुरूंचे महत्त्व साधकांच्या मनी ठसवले ।
सूक्ष्मातून त्रिवार नमन या संतमातांच्या
चरणी आम्हा साधकांचे ।। ७ ।।

ज्ञात नाही मजसी, मी लायक आहे का
समष्टी प्रार्थना करण्यासी ।
परि ‘देह असतांनाच आत्मभान जागृत व्हावे’,
अशी समष्टी प्रार्थना तव चरणांशी ।। ८ ।।

टीप – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

– श्री. संजय घाटगे, जयसिंगपूर, जिल्हा कोल्हापूर. (१३.८.२०२२)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक