पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकच्या पुराच्या संकटावर शोक व्यक्त केल्यावर पाकच्या पंतप्रधानांकडून आभार व्यक्त

इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकिस्तानमध्ये आलेल्या भीषण पुरामध्ये १ सहस्रांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला. पाकची सहस्रो कोटी रुपयांची हानी झाली आहे. या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत शोक व्यक्त केला होता. यानंतर पाकचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनीही ट्वीट करून पंतप्रधान मोदी यांचे आभार मानले आहेत. तसेच ‘पाकिस्तान या संकटावर मात करेल’, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

सौजन्य हिंदुस्तान टाईम्स