परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अनुसंधानात रहाण्यासाठी प्रयत्न करतांना सौ. श्रेया गावकर यांना आलेल्या अनुभूती

सर्व साधकांचा आधार असलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

सौ. श्रेया गावकर

१. ‘पूर्वी मला ‘प.पू. गुरुदेवांना (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना) स्थुलातून भेटावे आणि त्यांनी माझ्याशी बोलावे’, असे वाटायचे; पण ‘आता त्यांच्याशी सूक्ष्मातून बोलावे आणि त्यांना अनुभवत रहावे’, असे मला वाटते. त्यांना प्रत्यक्ष पाहिल्यावर माझी ज्याप्रमाणे भावजागृती होते, तशी त्यांच्याशी सूक्ष्मातून बोलल्यावरही माझी भावजागृती होते.

२. सेवा चालू करण्यापूर्वी काही वेळा माझ्याकडून प्रार्थना होत नाही; पण माझ्या मनात ‘सेवा चुकांविरहित, भावपूर्ण आणि परिपूर्ण व्हावी’, असा विचार असतो.

३. मी कलेशी संबंधित सेवा करते. एखाद्या धारिकेत ज्या ठिकाणी एखादी त्रुटी असते, तिथेच देवाच्या कृपेने माझे लक्ष जाते आणि मला ती त्रुटी सुधारता येते. त्या वेळी ‘देवच मला सेवा परिपूर्ण करण्यासाठी साहाय्य करत आहे’, असे जाणवते.

४. ‘परात्पर गुरु डॉक्टर, मला अनुभूती यावी किंवा माझी आध्यात्मिक उन्नती व्हावी’, असे मला वाटत नाही. ‘माझ्याकडून तुम्हाला अपेक्षित अशी शेवटपर्यंत सेवा व्हावी आणि तुमच्या अनुसंधानात रहाता यावे’, असे मला वाटते.

‘परात्पर गुरु डॉक्टर, तुम्हाला अपेक्षित असे तुम्हीच मला घडवा’, अशी तुमच्या चरणी प्रार्थना आहे.’

– सौ. श्रेया गावकर, गांजे, उसगाव, गोवा. (१८.१२.२०२०)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक