केरळ येथील उच्च न्यायालयाने अवैध धार्मिक स्थळे बंद करण्याचा आदेश तेथील सरकारला दिला आहे. केरळमधील मल्लपूरम् जिल्ह्यातील अमरबलम् ग्रामपंचायतीच्या परिसरातील व्यावसायिक इमारतीचे मशिदीत रूपांतर करण्याची अनुमती मागणारी याचिका ‘नूरुल इस्लाम संस्कारिका संगम’ या संस्थेने उच्च न्यायालयात प्रविष्ट केली होती. तेव्हा याविषयी निर्णय देतांना न्यायालयाने ‘५ किलोमीटरच्या परिघात ३६ मशिदी असतांना आणखी एक प्रार्थनास्थळ का हवे आहे ?’, अशी विचारणा केली आहे, तसेच ‘प्रत्येक रस्त्यालगत आणि चौकात मशीद हवी’, ‘प्रत्येक मुसलमानाच्या घराजवळ मशीद हवी’, असे हदीस किंवा कुराण यांत म्हटलेले नाहीत, असेही सांगितले आहे. न्यायालयाच्या या म्हणण्यामुळे पुष्कळ चांगले दिशानिर्देशन झालेले आहे. मशीद आणि अन्य धार्मिक स्थळे ही तेथील संबंधित धर्मियांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात असली पाहिजेत, हा सर्वसाधारण दंडक आहे. असे असतांना मात्र केवळ एकेश्वरवादाचा प्रसार करणार्या धर्मांकडून त्याचे पालन होतांना दिसत नाही. ‘आमचाच धर्म श्रेष्ठ’ अशी एक अहंगडयुक्त संकुचित भावना त्यामागे आहे, असे लक्षात येते.
केरळ हे देशातील सर्वांत अधिक साक्षरता असलेले राज्य आहे. केरळमध्ये सध्याच्या घडीला हिंदूंची लोकसंख्या ५४.७२ टक्के, मुसलमानांची २६.५० टक्के, तर ख्रिस्त्यांची १८.३८ टक्के आहे. वर्ष १९०१ मध्ये केरळमध्ये ६९ टक्के असलेली हिंदूंची लोकसंख्या वर्ष २०११ मध्ये ५५ टक्के म्हणजे १४ टक्क्यांनी अल्प झाली आहे. वर्ष २००१ ते २०११ या कालावधीत मुसलमानांची लोकसंख्या १२.८ टक्क्यांनी वाढली आहे. या आकडेवारीवरून केरळमध्ये इस्लामचा वेगाने प्रसार होत आहे, तर हिंदूंची लोकसंख्या आणि हिंदु धर्म उतरंडीला लागला आहे, असे लक्षात येते. केरळ येथे ‘इस्लाम’ वाढण्यासाठी आणि हिंदूंची संख्या घटण्यासाठी निश्चितपणे काही अयोग्य गोष्टी होत असण्याची दाट शक्यता आहे. केरळमध्ये आतापर्यंत आलेली हिंदु धर्मविरोधी साम्यवादी सरकारे हेसुद्धा यामागचे एक मोठे आणि महत्त्वाचे कारण आहे.
केरळची इस्लामीकरणाकडे वाटचाल !
भारतातील एक पारंपरिक हिंदु संस्कृती जपणार्या राज्याची अशी इस्लामीकरणाकडे वाटचाल का बरे होत असावी ? हा चिंतन करण्यासारखा प्रश्न आहे. केरळमध्ये लव्ह जिहादच्या घटना मोठ्या प्रमाणात उघडकीस येत आहेत. लव्ह जिहादमध्ये हिंदु तरुणींना फसवून त्यांचे धर्मांतर करणे, त्यांना आतंकवादी कारवायांमध्ये ढकलणे, आखाती देशांमध्ये त्यांना बळजोरीने पाठवणे या घटनाही उघड झाल्या आहेत. साम्यवाद्यांकडून हिंदूंचे ‘ते हिंदु आहेत’ म्हणून शिरकाण केले जात आहे. अत्यंत आक्रमकपणे इस्लामचा प्रसार करून हिंदूंना नेस्तनाबूत करण्याचे हे पद्धतशीर षड्यंत्र आहे. यासाठी आता मशिदींचा वापर केला जात आहे का ? असा संशय बळावण्यास संधी आहे. केरळ येथे मशिदी उभारण्यासाठी आखाती देश आणि तेथे काम करणारे केरळमधून गेलेले मुसलमान यांच्याकडून मोठ्या प्रमाणात अर्थसाहाय्य होत असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. परिणामी केरळमध्ये जगात अन्यत्र सहसा कुठे न आढळणार्या बहुमजली मशिदी आहेत. केरळ येथील एका गैरशासकीय स्वयंसेवी संघटनेने पंजाबमधील फरिदकोट येथे भारत-पाक सीमेजवळ ३ मशिदी उभारण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा आंतरराष्ट्रीय निधी वळता केल्याचे वृत्तही उघड झाले होते. या मशिदी सीमेच्या सुरक्षेसाठी धोकादायक ठरत होत्या. केरळमध्ये मशिदी बांधण्याच्या मोहिमेने वर्ष १९७५ मध्ये वेग पकडला, त्यानंतर वर्ष २००१ ते वर्ष २०१३ या १२ वर्षांमध्येच १ सहस्र १०० मशिदी बांधण्यात आल्या. वर्ष २०१३ मध्ये राज्यात मशिदींची संख्या ६ सहस्र ३६७ होती, ती वर्ष २०२२ मध्ये निश्चितपणे काही सहस्रांनी वाढलेली असू शकते.
मशिदींआडून दहशत
नवी मुंबई येथे अनेक मशिदी असतांना आणि हिंदू बहुसंख्य असलेल्या भागात मोठी मशीद बांधण्याचा कट रचण्यात आला होता. हिंदूंना त्याची कुणकुण लागताच त्यांनी आंदोलन केले. मशीद उभारल्यावर तेथून प्रतिदिन दिवसातील ५ वेळा भोंग्यांवरून कर्णकर्कश स्वरात बांग दिली जाणार, ज्यामुळे मशिदीलगतच्या हिंदूंची झोपमोड होणार, एवढेच नव्हे, तर आतापर्यंतचा अनुभव पहाता ‘काही वेळा मशिदींतून हिंदूंच्या मिरवणुकांवर दगडफेक केली जाणार, ये-जा करणार्या हिंदु महिलांची छेड काढली जाणार’, हेही ओघाने होणार आहे. परिणामी त्या परिसरातील वातावरण तणावग्रस्त बनू शकते. ‘मशीद झाल्यावर असे एक ना अनेक दुष्परिणाम होतील’, असे तेथील हिंदूंना वाटते. एखाद्या ठिकाणी मुसलमानांची संख्या अधिक आहे आणि उपलब्ध मशिदींमध्ये जागा अपुरी पडत असेल, तर मशिदीची मागणी एकवेळ योग्य ठरली असती; मात्र जिथे मुसलमानांची लोकसंख्याच अल्प आहे, तिथे मशिदींची मागणी करणे, हे इतरांना मन:स्ताप दिल्यासारखे आणि अन्य धर्मियांमध्ये दहशत निर्माण करणारे आहे.
मुंबई आणि नवी देहली येथे मशिदी उपलब्ध असतांना रस्ते अडवून नमाजपठण केले जाते. तेव्हा ‘तेथील वातावरण तणावग्रस्त बनते’, असा अनेकांना अनुभव आहे. सामाजिक माध्यमांवर नवी देहली येथील जामा मशिदीच्या प्रसारित झालेल्या छायाचित्रांमध्ये नमाजपठणाच्या वेळी मशिदीच्या परिसरात पुष्कळ जागा उपलब्ध असूनही रस्ता अडवून नमाजपठण होत असल्याचे लक्षात आले. याला काय म्हणायचे ? ही निव्वळ दादागिरी नाहीतर काय ? मशिदींची संख्या वाढवली जात आहे, याचा दुसरा अर्थ भविष्यातील इस्लामीकरणाची पूर्वसिद्धताच म्हणता येईल. भारतात सर्वांत अधिक वाढणार्या धर्मामध्ये इस्लाम आघाडीवर आहे. एकूण जगातील मुसलमानांच्या लोकसंख्येच्या तुलनेत भारतातील मुसलमानांची संख्या वेगाने वाढत आहे. वर्ष २०४७ पर्यंत भारताचे ‘इस्लामीस्तान’ करण्याचे आतंकवादी संघटनांचे नियोजन असल्याची माहिती पकडण्यात आलेल्या आतंकवाद्यांकडून मिळाली. त्यामुळे हिंदूंच्या अस्तित्वासाठी मशिदींची संख्या वाढवून केला जाणारा जिहाद रोखलाच पाहिजे, हे हिंदूंनी लक्षात घ्यावे !
प्रार्थनास्थळांची संख्या वाढवून जिहाद करण्याचा धर्मांधांचा प्रयत्न हिंदूंनी संघटितपणे हाणून पाडावा ! |