काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेच्या विजयाच्या जल्लोषाच्या वेळी ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा !

पाली (राजस्थान) येथील घटना

जयपूर – राजस्थानच्या पाली येथील ‘मारवाड जंक्शन कॉलेज’मध्ये झालेल्या विद्यार्थ्यांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसची विद्यार्थी शाखा ‘नॅशनल स्टुडेंट्स युनियन ऑफ इंडिया’चे उमेदवार विजयी झाले. यामध्ये उपाध्यक्ष पदावर आरूढ झालेल्या फिजा खान यांच्या विजयाचा जल्लोष साजरा करतांना ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देण्यात आल्या. या घटनेचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून मोठ्या प्रमाणात प्रसारित होत आहे. पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली असून कारवाई करण्यात येईल, असे आश्‍वासन दिले आहे.

मे २०२२ मध्येही झारखंडच्या हजारीबागमध्ये झालेल्या पंचायत निवडणुकांच्या वेळी अमीना खातून यांचा विजय झाल्यावर ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देण्यात आल्या होत्या. त्या वेळी पोलिसांनी खातून यांच्यासह एकूण ६२ लोकांच्या विरोधात गुन्हा नोंद केला होता.

संपादकीय भूमिका 

मुसलमानांचे लांगूलचालन करण्यात संपूर्ण आयुष्य वेचलेल्या काँग्रेसींकडून अजून कोणती अपेक्षा करणार ? अर्थात् भारताच्या अखंडतेला अशा प्रकारे दशकानुदशके सुरुंग लावणारी काँग्रेस आता केवळ विद्यार्थ्यांच्या निवडणुकांमध्येच विजयी होते, हे तिने लक्षात ठेवावे !