कर्नाटकमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या फलकांना होणार्या विरोधाचे प्रकरण
बेळगाव – कर्नाटकमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या फलकांवरून वाद चालू आहे. काँग्रेसकडून या फलकांना विरोध केला जात आहे. या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी शिवमोग्गा येथील भाजपचे आमदार के.एस्. ईश्वरप्पा यांनी मुसलमान तरुणांना नियंत्रणात रहाण्याचे आवाहन केले होते. आता श्रीराम सेनेचे प्रमुख श्री. प्रमोद मुतालिक यांनी ‘संपूर्ण राज्यात वीर सावरकर आणि बाळ गंगाधर टिळक यांचे १५ सहस्र भित्तीपत्रके लावण्यात येतील.
#HinduSena chief warns ‘Will cut your hand if you touch Savarkar’s posters’, adds ‘Fight against Britishers, not Muslims’https://t.co/oCVkgJsugA
— Zee News English (@ZeeNewsEnglish) August 23, 2022
स्वातंत्र्यवीर सावरकर हे मुसलमानांच्या विरुद्ध नव्हते, ते इंग्रजांविरुद्ध होते. ते स्वातंत्र्य लढ्यातील सेनानी होते. जर मुसलमान किंवा काँग्रेस यांनी सावरकरांच्या भित्तीपत्रकाला स्पर्श केला, तर त्यांचे हात कापू’, अशी चेतावणी दिली आहे.