(म्हणे) ‘दिग्गज व्यक्ती असणार्‍या आमीर खान यांच्यावर बहिष्कार घालणे, ही विचित्र गोष्ट !’

निर्माती एकता कपूर यांचे विधान !

निर्माती एकता कपूर (उजवीकडे )

मुंबई – जिच्यामुळे चित्रपटसृष्टी भरभराटीला आली, अशा व्यक्तीवरच बहिष्कार घातला जात आहे, ही किती विचित्र गोष्ट आहे ! हिंदी चित्रपटसृष्टीचे सगळे खान आणि विशेषकरून आमीर खान म्हणजे दिग्गज व्यक्ती आहे. आपण तिच्यावर बहिष्कार घालू शकत नाही, असे विधान निर्माती एकता कपूर यांनी करून खान यांना पाठिंबा दिला आहे. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये एकता कपूर यांना ‘लाल सिंग चढ्ढा’ या चित्रपटावर बहिष्कार टाकण्यात आल्याचे कारण विचारण्यात आले होते. तेव्हा त्या बोलत होत्या.

संपादकीय भूमिका

  • चित्रपटसृष्टीला आर्थिक लाभ मिळवून देणार्‍या ‘खाना’वळींनी राष्ट्र आणि धर्म यांची किती हानी केली आहे, हे एकता कपूर यांना ठाऊक आहे का ?
  • मोठ्या प्रमाणात बहिष्कार घातला जात असतांना त्यामागील कारणांचा विचार न करता बेताल विधाने करणार्‍या एकता कपूर यांच्या चित्रपटांवरही बहिष्कार घालायचा कि नाही, हे आता प्रेक्षकांनीच ठरवावे !