मोगादिशु (सोमालिया) येथील हयात हॉटेलमध्ये जिहादी आतंकवादी आक्रमण : ८ जण ठार, तर ९ जण घायाळ

मोगादिशु (सोमालिया) – येथे ‘अल्-कायदा’शी संबंधित ‘अल्-शबाब’ या जिहादी आतंकवादी संघटनेने येथील हॉटेल हयातमध्ये घुसून मुंबईवरील २६/११ च्या आक्रमणाप्रमाणे आक्रमण केले. यात ८ जण ठार, तर ९ हून अधिक लोक घायाळ झाले आहेत. या आतंकवाद्यांनी हॉटेलमध्ये अनेक जणांना ओलीस धरल्याचे वृत्त आहे. आतंकवादी हॉटेलमध्ये लपले असून त्यांची सुरक्षारक्षकांशी चकमक चालू होती. आतंकवाद्यांनी हॉटेलमध्ये शिरण्यापूर्वी एक मोठा बाँबस्फोट केल्याचीही माहिती आहे. सुरक्षारक्षकांनी संपूर्ण परिसराला घेराव घातला आहे. सोमालियामध्ये यापूर्वीही अनेक आक्रमणे झाली असून त्यात शेकडो जणांचा बळी गेला आहे.

अल्-शबाब या आतंकवादी संघटनेने या आक्रमणाचे दायित्व स्वीकारले आहे. या संघटनेचा मुख्य उद्देश ‘वर्ष २०१७ मध्ये सोमालियात स्थापन झालेले सरकार उखडून टाकणे’, हा आहे. अल्-शबाबची स्थापना वर्ष २००६ मध्ये झाली. ही संघटना सौदी अरेबियाच्या वहाबी इस्लामला मानते.

संपादकीय भूमिका 

जिहादी आतंकवादाने संपूर्ण जग त्रस्त आहे ! याविरोधात आता संपूर्ण जगाने संघटित होऊन जिहादी मानसिकता नष्ट करण्यासाठी युद्धस्तरावर प्रयत्न केले पाहिजेत !