(म्हणे) ‘नूपुर शर्मा यांना ईशनिंदेची शिक्षा देऊन ‘संरक्षण जिहाद’ करा !’

अल्-कायदाकडून भारतातील मुसलमानांना चिथावणी !

नवी देहली – जिहादी आतंकवादी संघटना अल्-कायदाने आता भारतातील मुसलमानांना ‘भाजपच्या माजी राष्ट्रीय प्रवक्त्या नूपुर शर्मा यांना ईशनिंदेची शिक्षा करा’, अशा प्रकारे चिथावणी दिली आहे. अल्-कायदाने त्याचे मुखपत्र ‘नवा-ए-घवा-ए-हिन्द’च्या माध्यमातून ही चिथावणी देत यास ‘संरक्षण जिहाद’ असे म्हटले आहे. काही दिवसांपूर्वी भारतीय वंशाचे अमेरिकी लेखक सलमान रश्दी यांच्यावर झालेल्या प्राणघातक आक्रमणानंतर भारतातील गुप्तचर संघटना आणि पोलीस हे नूपुर शर्मा यांच्यासंदर्भात आधीच सतर्क झाले आहेत. त्यातच ‘अल् कायदाची ही चिथावणी अधिकच गंभीर स्थिती निर्माण करू शकते’, असे म्हटले जात आहे.
महंमद पैगंबर यांच्या विरोधात केलेल्या कथित आक्षेपार्ह टिप्पणीवरून जगभरातील मुसलमान देश, तसेच धर्मांध मुसलमान हे आधीच नूपुर शर्मा यांना ‘सर तन से जुदा’ करण्याची (शिर धडापासून वेगळे करण्याची) धमकी देत आले आहेत.

अल्-कायदाने त्याच्या नियतकालिकाच्या ताज्या अंकामध्ये म्हटले आहे की…

१. भारतीय मुसलमानांनी नूपुर शर्मा यांचा सूड घ्यावा. यासाठी त्यांनी शस्त्रास्त्रे एकत्रित करावीत आणि ती चालवण्याचे प्रशिक्षण घ्यावे. अल् कायदाने यास ‘संरक्षण जिहाद’ असे नामकरण केले आहे.

२. भारतीय मुसलमानांनी काश्मीरममध्ये चालू असलेल्या जिहादी कारवायांमध्ये सहभाग घ्यावा.

३. जर मुसलमानांनी महंमद पैगंबर यांना विरोध करणार्‍या नूपुर शर्मा यांचा सूड उगवला नाही, तर मुसलमानांची स्थिती वाईट होईल.

४. याआधी जून मासातही अल् कायदाने नूपुर शर्मा यांचा सूड घेण्यासाठी त्यांच्यावर आत्मघातकी आक्रमण करण्याची घोषणा केली होती.

संपादकीय भूमिका

जिहादी आतंकवादी संघटना, तसेच त्यांचे समर्थक मुसलमान यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्यासाठी आता केंद्रशासनाने कंबर कसणे आवश्यक !