(‘सर तन से जुदा’ म्हणजे शिर धडापासून वेगळे करणे)
खंडवा (मध्यप्रदेश) – येथे मोहरमच्या मिरवणुकीत पोलिसांच्या उपस्थितीतच ‘सर तन से जुदा’च्या घोषणा देण्यात आल्याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहे. ही घटना १० ऑगस्टच्या रात्रीची आहे. या प्रकरणी पोलीस अन्वेषण करत असून घोषणा देणार्यांचा शोध घेत आहेत.
UP: Muslim youth chant ‘Sar Tan Se Juda’ during Muharram procession in Jaunpur https://t.co/MFUWX7JQBG
— Hindustan Times (@HindustanTimes) August 12, 2022
शहरातील जलेबी चौकातून ही विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. मोहरमच्या ताजियांचे विसर्जन करण्यात येत होते. या मिरवणुकीत काही तरुण ‘गुस्ताख-ए-नबी की एक ही सजा, सर तन से जुदा, सर तन से जुदा’ (जो महंमद पैगंबर यांचा अपमान करील, त्याला ‘ शिर धडापासूनवेगळे करणे’, ही एकच शिक्षा मिळेल), अशी घोषणा देत असल्याचे दिसून आले. ज्या वेळी या घोषणा दिल्या जात होत्या, त्या वेळी पोलीसही घटनास्थळी उपस्थित होते.
संपादकीय भूमिका
|