नोएडा (उत्तरप्रदेश) येथे आरिफ खान याच्याकडून हिंदु असल्याचे भासवून हिंदु तरुणीवर अनेक वेळा बलात्कार

नोएडा (उत्तरप्रदेश) – येथील एका हिंदु तरुणीने आरिफ खान नावाच्या मुसलमान तरुणाच्या विरोधात ‘लव्ह जिहाद’च्या प्रकरणी पोलिसांत तक्रार प्रविष्ट केली आहे. या तक्रारीत तिने म्हटले आहे की, आरिफ खान याने अरिकान राणा हे हिंदु नाव धारण करून तिला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले.

लग्नाच्या बहाण्याने तिच्यावर अनेक वेळा बलात्कार केला, तसेच तिचा गर्भपातही केला. गर्भपात झाल्यानंतर आरिफ याने तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला, तसेच तिला शिवीगाळ आणि मारहाणही केली, असेही पीडित हिंदु तरुणीने तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी नोएडा पोलीस अन्वेषण करत आहेत, अशी माहिती पोलीस अधिकारी पंकज कुमार यांनी दिली.

संपादकीय भूमिका

अशा नराधमांच्या विरोधात जलद गती न्यायालयात खटला चालवून त्यांना तात्काळ फाशीची शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न करणे आवश्यक !