देशाच्या अखंडतेसाठी राष्ट्रप्रेमींनी व्यवस्थेवर अवलंबून न रहाता राष्ट्रविरोधकांशी वैध मार्गाने दोन हात करणे आवश्यक !
देशात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे पडघम वाजत आहेत. केंद्रशासनाने २० कोटी घरांवर राष्ट्रध्वज फडकावण्याचे ध्येय घेतले असून सर्वच स्तरांवर जागृती केली जात आहे. जनताही स्वातंत्र्यदिनाच्या ऐतिहासिक क्षणाची आतुरतेने वाट पहात आहे. असे असतांना याला स्वातंत्र्यदिनाच्या विरोधात होणार्या कारवायांमुळे गालबोट लागत आहे. ‘सर तन से जुदा’ची हिंदुविरोधी मोहीम जिथे शांत होण्याचे नाव घेत नाही, तिथे स्वातंत्र्यदिनाला विरोध करून हाहा:कार माजवण्यास पुन्हा आरंभ झाला आहे. स्वातंत्र्यदिनाला विरोध करण्याचा हा प्रकार तसा नवीन नाही. ज्या गीतातून भारतियांना स्वातंत्र्यलढ्यात उडी घेण्यासाठी प्रेरणा मिळत असे, त्या ‘वन्दे मातरम्’ला या देशातील एक मोठा समुदाय विरोध करत आला आहे.
राष्ट्रविरोधी कारवायांमध्ये वाढ !
स्वातंत्र्यदिनाला विरोध होत असल्याच्या अनेक घटना पुढे येत आहेत. उत्तरप्रदेशातील कानपूरमध्ये मोहरमच्या पूर्वसंध्येला काढण्यात आलेल्या एका मिरवणुकीत भारताच्या राष्ट्रध्वजावर अशोक चक्राच्या ठिकाणी मशीद आणि ‘चाँद-तारा’ छापल्याचे समोर आले. यातून या घटनेशी संबंधित मुसलमानांच्या राष्ट्रविघातक मानसिकतेचा अंदाज येतो. अन्य एका घटनेत उत्तरप्रदेशातीलच हरदोई येथे राष्ट्रप्रेमींकडून ‘तिरंगा यात्रा’ काढण्याचे नियोजन होते. त्या वेळी लोकांना घाबरवण्यासाठी दोन्ही हातात बंदूक घेतलेल्या फारूक नावाच्या एका तरुणाने यात्रेच्या मार्गावर अडथळे आणण्याचा प्रयत्न केला, तसेच काही धर्मांध मुसलमानांनी तेथील एका हिंदूच्या घरावर दगडफेकही केली. अशा घटनांवर हिंदुत्वनिष्ठ संघटना सोडून अन्य कोणत्याच संघटना अथवा पक्ष चकार शब्दही काढत नाहीत; परंतु जेव्हा-जेव्हा भारतीय मुसलमानांच्या राष्ट्रप्रेमावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते, तेव्हा-तेव्हा धर्मनिरपेक्षतेचा उदो उदो करणारी हीच मंडळी मुसलमानांना त्यांचे राष्ट्रप्रेम सिद्ध करण्याची आवश्यकता नसल्याची बांग देत बसतात. अशा प्रकारे राष्ट्रध्वजाचे ‘विकृतीकरण’ करण्याला राष्ट्रभक्ती म्हणायचे का ? जनतेत राष्ट्रप्रेमाचे स्फुलिंग चेतवणारी तिरंगा यात्रा होऊ नये, यासाठी प्रयत्न करणार्यांना ‘राष्ट्रभक्त’ म्हणायचे का ? ही तीच मंडळी आहेत, जी भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यात भारत जिंकला, तर हिंदूंना त्रास देतात आणि पाक जिंकला की, फटाके फोडून जल्लोष करतात. ‘हर घर तिरंगा’ या मोहिमेद्वारे मुसलमान बांधवांना त्यांच्यावरील भारतविरोधी डाग पुसण्याची नामी संधी चालून आली आहे. याचा लाभ घेण्याऐवजी बहुतांश मुसलमान राष्ट्रविघातक कारवाया करण्यात गुंतले आहेत. यावर निधर्मीवादी ब्रिगेड सोयीस्कररित्या मौन बाळगते, हेही तितकेच खरे !
भारतमातेचा ‘धर्म’ !
अशीच एक घटना कर्नाटकातील मंगळुरू येथे पहावयास मिळाली. मंगळुरू विश्वविद्यालयामध्ये ११ ऑगस्टच्या सायंकाळी ‘भारतमाता पूजना’च्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यास अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने समर्थन दिले होते. कार्यक्रमाच्या प्रचारार्थ जारी केलेल्या भित्तीपत्रकामध्ये अखंड भारताच्या नकाशासमोर भारतमाता तिच्या हातात भगवा ध्वज घेऊन उभी असल्याचे दाखवण्यात आले होते. जिहादी आतंकवादी संघटना ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ची विद्यार्थी शाखा ‘कॅम्पस फ्रंट ऑफ इंडिया’ने (‘सी.एफ्.आय.’ने) मात्र यावर आक्षेप घेत, ‘जर हिजाब घालण्यास शाळा-महाविद्यालयांत अनुमती नसेल, तर अशा प्रकारे भगवा ध्वज हातात घेतलेल्या भारतमातेच्या पूजनाच्या कार्यक्रमाला अनुमती मिळणे अस्वीकारार्ह आहे’, असे म्हटले. या तर्कहीन आणि संतापजनक आक्षेपावर आयोजकांनी स्पष्ट केले की, या कार्यक्रमात कुणीच भगवी वस्त्रे परिधान करणार नसून कार्यक्रम सायंकाळी वर्गातील सर्व तास संपल्यानंतर घेण्यात येईल. ‘सी.एफ्.आय.’ला मुळात भारतमातेने हातात घेतलेला भगवा झेंडा आणि भगव्या रंगातील अखंड भारताच्या चित्रावर आक्षेप आहे’, हे लक्षात घ्या ! जिथे मातृ संघटना ‘पी.एफ्.आय.’ने वर्ष २०४७ पर्यंत भारताला इस्लामी राष्ट्र बनवण्याचे स्वप्न उरी बाळगले आहे, तिथे ‘सी.एफ्.आय.’ला अखंड भारत ज्यामध्ये पाकिस्तानलाही भगवे रंगवण्यात आले आहे, ते पचनी तरी कसे पडेल ? दुसरीकडे याच ‘पी.एफ्.आय.’ची राजकीय संघटना ‘एस्.डी.पी.आय.’चा ध्वज बिहारच्या नालंदा येथील एका सरकारी शाळेमध्ये फडकावल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. यातून समाजात राष्ट्रविरोधी विष कालवण्यासाठी कोण आणि कोणत्या पद्धतीने प्रयत्नशील आहे, हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. अर्थात् पी.एफ्.आय. आणि तिच्याशी संलग्न असलेल्या सर्व संघटना यांच्यावर आता कायमची बंदी लादली पाहिजे. या मागणीच्या पूर्ततेसाठी राष्ट्रव्यापी मोहीम हाती घेणे आवश्यक बनले आहे. अशा घटनांमध्ये निधर्मीवादाचे ढोंग करणारी काँग्रेस आणि ‘तुकडे तुकडे गँग’ यांची भूमिका नेहमीप्रमाणे हिंदूंना बोचत आहे. बिहार आणि झारखंड राज्यांमधील शेकडो सरकारी शाळांना रविवारच्या ऐवजी शुक्रवारी सुटी देण्यावरून शरीयत लागू करण्याचा प्रयत्न होत असतांना त्यावर एक शब्दही न उच्चारणारी ही टोळी भारतमातेच्या पूजनास विरोध करत आहे. यांना भारतमातेचाही धर्म दिसत आहे ?
हिंदू जगाच्या पाठीवर कुठेही गेले, तरी ते त्या प्रांतातील संस्कृतीशी एकरूप होतात. त्या भूमीला सर्वस्व मानून त्या राष्ट्राच्या समृद्धीस हातभार लावतात. अमेरिका, कॅनडा, ब्रिटन अशी अनेक उदाहरणे देता येतील. अगदी पाकिस्तान अथवा बांगलादेश यांचा विचार केला, तरी तेथील हिंदूंना तो देश जवळचा वाटतो. भारतातील अनेक मुसलमान मात्र देशाच्या विघटनासाठी कार्यरत आहेत. त्यामुळे यंदाच्या अमृत महोत्सवाला राष्ट्रप्रेमींनी अशांशी वैध मार्गाने दोन हात करण्यासाठी सज्ज होणे आवश्यक आहे. ‘या निर्णायक लढ्यात राष्ट्रप्रेमी पराभूत झाले, तर पुढील २५ वर्षांत राष्ट्रविघातक कारवाया करणारी टोळी यशस्वी होईल आणि इस्लामी भारताचे स्वप्न साकारले जाईल’, हे लक्षात ठेवा !