नालंदा (बिहार) येथील सरकारी शाळेत एस्.डी.पी.आय. चा फडकावण्यात आला ध्वज !

एस्.डी.पी.आय. ही जिहादी आतंकवादी संघटना ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ची राजकीय शाखा !

सरकारी उर्दू शाळेमध्ये ‘सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया’चा (एस्.डी.पी.आय.चा) फडकवलेला ध्वज

नालंदा (बिहार) – गेल्या काही आठवड्यांमध्ये राज्यातील अनेक मुसलमानबहुल शाळांना रविवारच्या ऐवजी शुक्रवारी सुटी असल्याच्या घटना समोर आल्या होत्या. त्यानंतर आता नालंदा जिल्ह्यातील एका सरकारी उर्दू शाळेमध्ये ‘सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया’चा (एस्.डी.पी.आय.चा) ध्वज फडकावल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. एस्.डी.पी.आय. ही जिहादी आतंकवादी संघटना ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ची (‘पी.एफ्.आय.’ची) राजकीय शाखा आहे.

१. संबंधित व्हिडिओमध्ये एस्.डी.पी.आय.च्या ध्वजाला विद्यार्थी मानवंदना देत असल्याचेही दिसत आहे. ही घटना कधी घडली, हे आतापर्यंत स्पष्ट होऊ शकलेले नाही.

२. उपजिल्हाधिकारी अनुराग ठाकूर यांनी ‘हे कायद्याचे उल्लंघन आहे’, असे म्हटले असून या प्रकरणाचे अन्वेषण करून संबंधितांवर कारवाई केली जाईल, असे आश्‍वासन दिले आहे. शाळेच्या व्यवस्थापनाला या घटनेविषयी माहिती होती का, याचेही अन्वेषण करून त्याच्यावरही कारवाई केली जाईल, असे ते म्हणाले.

३. गेल्या मासात राजधानी पाटलीपुत्र येथील फुलवारी शरीफ या मुसलमानबहुल भागातून पी.एफ्.आय.च्या दोन आतंकवाद्यांना अटक करण्यात आली होती. ‘पी.एफ्.आय. वर्ष २०४७ पर्यंत भारताला इस्लामी राष्ट्र बनवण्यासाठी प्रयत्नरत आहे’, या संबंधीची कार्यप्रणाली असलेली कागदपत्रे त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आली होती.

संपादकीय भूमिका

शाळांना आधी रविवारच्या ऐवजी शुक्रवारी सुटी देणे आणि आता आतंकवादी संघटनेचा ध्वज फडकावणे, यातून हे षड्यंत्र भारताला कोणत्या दिशेने घेऊन जात आहे, हे स्पष्ट होते ! यास उत्तरदायी असलेल्यांना कठोरात कठोर शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न करणे अत्यावश्यक !