रशियाच्या हवाई तळावर स्फोट : स्फोटामागे हात नसल्याचा युक्रेनचा दावा

मॉस्को/कीव – रशिया-युक्रेन युद्ध चालू असतांनाच क्रिमियन द्वीपकल्पातील समुद्रकिनारी असलेल्या ‘रिसॉर्ट’जवळ अनेक स्फोट झाले. यासह रशियाच्या हवाई तळावर साठवलेल्या दारूगोळ्याचा स्फोट झाला.

हे स्फोट युक्रेनने केले कि नाही ?, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही; मात्र हवाई तळावर साठवलेल्या दारूगोळ्याचा स्फोट झाल्याचे रशियाने म्हटले आहे. युक्रेनने रशियाच्या हवाई तळावरील आक्रमणात हात नसल्याचे म्हटले आहे. या स्फोटात एकाचा मृत्यू झाला, असे वृत्त ‘अमर उजाला’ ने प्रसिद्ध केले आहे.