नेपाळ सीमेवरून भारतात घुसखोरी करणार्‍या तिघांना अटक

एका पाकिस्तानी तरुणीचा समावेश

खादीजा नूर

नवी देहली – नेमाळमार्गे भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणार्‍या तिघांना सीमा सुरक्षा दलाच्या सैनिकांनी अटक केली. यात एका पाकिस्तानी तरुणीचा समावेश आहे, तर अन्य दोघांपैकी एक भारतीय मुसलमान आणि एक नेपाळी तरुण आहे. बिहारच्या सीतामढी जिल्ह्यातील तपासणी नाक्यावर त्यांना पकडण्यात आले. तरुणीचे नाव खादीजा नूर आहे. ‘हे तिघेही हेरगिरीसाठी भारतात घुसखोरी करणार होते’, असा संशय आहे.

जून मासात सीतामढी सीमेवरूनच दोघा चिनी नागरिकांना पकडण्यात आले होते. ते नेपाळमार्गे भारतात आले होते आणि नंतर पुन्हा नेपाळमार्गे चीनला जात असतांना त्यांना पकडण्यात आले होते.