‘ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट’चे अध्यक्ष मौलाना बदरुद्दीन अजमल यांचे विधान !
गौहत्ती (आसाम) – जर मदरशांमध्ये वाईट कृत्ये करणारे लोक सापडत असतील, तर आम्हाला त्यांच्याविषयी जराही सहानुभूती नाही. सरकारने अशांना गोळ्या घातल्या पाहिजेत, असे विधान ‘ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट’चे अध्यक्ष मौलाना बदरुद्दीन अजमल यांनी केले.
‘कुछ लोगों की वजह से पूरी मुस्लिम कौम को न करें बदनाम’, बोले AIUDF चीफ बदरुद्दीन#AIUDF | #BadaruddinAjmalhttps://t.co/1Izt4g8a8J
— TV9 Bharatvarsh (@TV9Bharatvarsh) August 6, 2022
अजमल पुढे म्हणाले की, जर मदरशांमध्ये १-२ वाईट शिक्षक सापडत असतील, तर सरकारने त्यांची चौकशी करावी. त्यात ते दोषी आढळल्यास सरकारने त्यांच्यावर कारवाई करावी; पण त्यांच्यामुळे संपूर्ण मुसलमानांना ‘जिहादी’ म्हणणे योग्य नाही. हा ‘जिहाद’ नाही, तर ‘आतंकवाद’ आहे. सरकारने तो रोखला पाहिजे. सरकारने भारताच्या सीमांचे रक्षण केले पाहिजे. गुप्तचर यंत्रणांना सशक्त केले पाहिजे.
संपादकीय भूमिका
|