नवी देहली – अझरबैजान आणि अर्मेनिया या दोन देशांमध्ये पुन्हा युद्धाला प्रारंभ झाला आहे. अझरबैजानने केलेल्या आक्रमणात अर्मेनियाचे दोन सैनिक ठार झाले आहेत. अझरबैजानच्या संरक्षण मंत्रालयाने वादग्रस्त नागोर्नो-काराबाख भागातील अनेक डोंगरांवर नियंत्रण मिळवल्याचा दावा केला आहे. अर्मेनियाच्या सैनिकांनीही या भागामध्ये अझरबैजानच्या एका सैनिकाला ठार मारल्याने दोन्ही देशात तणाव वाढला आहे. या युद्धात अर्मेनियाचे १९ सैनिक घायाळही झाले असून यांतील चौघांची प्रकृती चिंताजनक आहे. या भागामध्ये रशियाचे शांतीसैन्यदेखील तैनात आहे. अझरबैजानने ३ वेळा युद्धविरामाचे उल्लंघन केले आहे. या दोन्ही देशांमध्ये यापूर्वी १९९०च्या दशकात, तसेच वर्ष २०२० मध्येही युद्ध झाले होते.
सनातन प्रभात > Post Type > बातम्या > आंतरराष्ट्रीय बातम्या > अझरबैजान आणि अर्मेनिया यांच्यात पुन्हा युद्धाला प्रारंभ
अझरबैजान आणि अर्मेनिया यांच्यात पुन्हा युद्धाला प्रारंभ
नूतन लेख
(म्हणे) ‘भारताचे चंद्रयान-३ चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर नाही, तर दक्षिण गोलार्धात उतरले ! – चीन
जगभरात पकडण्यात आलेल्या भिकार्यांमध्ये पाकिस्तान्यांची संख्या ९० टक्के !
शेतीच्या यांत्रिकीकरणासाठी राज्यशासन करणार ब्राझीलमधील शेतीचा अभ्यास
कॅनडामध्ये लोकशाहीच्या नावाखाली हिंसाचाराचे समर्थन केले जात आहे !
कॅनडाच्या संसदेत नाझी सैनिकाचा सन्मान केल्याने अध्यक्षांचे त्यागपत्र
अवैध स्थलांतर रोखण्यासाठी युरोपीय संघाच्या धोरणांमध्ये पालट आवश्यक ! – हंगेरीचे पंतप्रधान