अलीगड मुस्लिम विश्‍वविद्यालय चालू करणार सनातन धर्मावर अभ्यासक्रम !

नवी देहली – अलीगड मुस्लिम विश्‍वविद्यालयाने त्याच्या ‘इस्लामिक स्टडीज’ विभागात आता सनातन धर्माच्या अभ्यासाचा समावेश केला आहे. हा अभ्यासक्रम पदव्युत्तर पदवी घेतांना शिकवला जाणार आहे. ‘सर्व धर्मांतील बारकावे शिकवण्याचा आमचा उद्देश आहे’, अशी माहिती विश्‍वविद्यालयाचे जनसंपर्क अधिकारी उमर सलीम पीरजादा यांनी दिली. येथे प्रत्येक जाती-धर्माचे विद्यार्थी शिक्षण घेतात. त्यामुळे हे एक चांगले उदाहरण असेल, असेही त्यांनी सांगितले.

संपादकीय भूमिका

या विश्‍वविद्यालयातील बहुतांश विद्यार्थी आणि प्राध्यापक यांचा इतिहास हिंदुद्वेषी असल्याचे अनेक घटनांतून समोर आले आहे. त्यामुळे अशा विश्‍वविद्यालयात सनातन धर्माविषयी योग्य शिकवले जाईल का ?, असा प्रश्‍न कुणाच्या मनात निर्माण झाल्यास चुकीचे काय ?