बद्धकोष्ठता

‘बद्धकोष्ठतेसाठी गंधर्व हरीतकी वटी’ या औषधाच्या २ ते ४ गोळ्या रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्यासह घ्याव्यात. यासह भूक न लागणे, जेवण न जाणे, अपचन होणे, पोटात वायू (गॅस) होणे, ही लक्षणे असल्यास ‘लशुनादी वटी’ या औषधाच्या १ – २ गोळ्या दोन्ही वेळच्या जेवणाच्या १५ मिनिटे आधी चघळून खाव्यात. याने पाचक स्राव चांगल्या प्रकारे निर्माण होतात. बद्धकोष्ठतेवरील हे उपचार १५ दिवस करावेत.’
– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२७.७.२०२२)
सनातनची ‘गंधर्व हरीतकी वटी’ आणि ‘लशुनादी वटी’ ही औषधे आता उपलब्ध आहेत. या औषधांचे सविस्तर उपयोग औषधाच्या डबीसोबतच्या पत्रकात दिले आहेत. पत्रक सांभाळून ठेवावे. औषधे वैद्यांच्या समादेशाने (सल्ल्याने) घ्यावीत. |