‘बुकर’ पुरस्कार विजेत्या गीतांजली श्री यांचा आगरा येथील कार्यक्रम स्थगित

पुस्तकातून हिंदूंच्या देवतांविषयी आक्षेपार्ह लिखाण केल्याच्या विरोधात पोलिसांत तक्रार

लेखिका गीतांजली श्री

आगरा (उत्तरप्रदेश) – आंतराष्ट्रीय ‘बुकर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या लेखिका गीतांजली श्री यांच्या कादंबरीमध्ये हिंदूंच्या देवतांविषयी आक्षेपार्ह लिखाण असल्याने त्यांच्या सन्मानार्थ येथे आयोजित कार्यक्रम हिंदूंच्या विरोधानंतर स्थगित करण्यात आला. गीतांजली यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट करण्यात आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. सांस्कृतिक संघटना ‘रंगलीला’ आणि ‘आगरा थिएटर क्लब’ यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

याविषयी बोलतांना ‘रंगलीला’चे अनिल शुल्का यांनी सांगितले, ‘‘गीतांजली श्री यांनी श्री शंकर आणि श्री पार्वती या देवतांविषयी आक्षेपार्ह मत व्यक्त केल्याचा आरोप करत  हाथरस येथील संदीप कुमार पाठक यांनी गीतांजली श्री यांच्या विरोधात तक्रार केली आहे.’’ लेखिका गितांजली यांच्या म्हणण्यानुसार त्यांना विनाकारण राजकीय वादात ओढण्यात येत आहे.

संपादकीय भूमिका

हिंदूंच्या देवतांचा अवमान करणार्‍यांना पुरस्कार मिळतात, हे लक्षात घ्या ! अशांवर गुन्हा नोंदवून त्यांच्यावर कारवाई झाली, तरच इतरांवर वचक बसेल !