मारेकर्‍यांना फाशी द्या ! – भाजपचे मृत नेते प्रवीण नेट्टारू यांची आई

हत्येच्या घटनेमुळे आमच्या मनात राग आहे ! – मुख्यमंत्री बोम्माई

भाजपचे मृत नेते प्रवीण नेट्टारू यांची आई

बेंगळुरू – दक्षिण कन्नड जिल्ह्यातील भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा सचिव प्रवीण नेट्टारू यांची जिहाद्यांनी हत्या केल्यानंतर सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. ‘प्रवीण आमचा एकुलता एक मुलगा होता. माझे स्वास्थ्य ठीक नसते. त्याच्या वडिलांनाही हृदयविकार आहे. तो आमचा एकमेव आधार होता. आमच्या अपेक्षा पूर्ण करायला कुणीच उरले नाही’, अशा शब्दांत नेट्टारू यांच्या आईने दु:ख व्यक्त केले. ‘ज्याने प्रवीणची हत्या केली, त्याला फाशी झाली पाहिजे’, अशी मागणीही त्यांनी केली.

या हत्येच्या घटनेनंतर राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी २८ जुलै या दिवशी त्यांच्या सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित केलेले सर्व कार्यक्रम रहित केले आहेत. बोम्माई म्हणाले, ‘‘या हत्येमुळे आमच्या मनात राग आहे.’’

अशा घटनांना तोंड देण्यासाठी ‘कमांडो फोर्स’ सिद्ध करणार !

देशविरोधी आणि आतंकवादी शक्तींचा नायनाट करण्यासाठी सरकारने राज्यात विशेष प्रशिक्षित ‘कमांडो फोर्स’ सिद्ध करण्याचा निर्णय घेतल्याची घोषणाही बोम्माई यांनी केली.

संपादकीय भूमिका

मुळात हिंदू आणि त्यांच्या नेत्यांच्या हत्या होऊ नयेत, यासाठी सरकार काय करणार आहे, याचे उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यायला हवे, असेच हिंदूंना वाटते !