काबूल (अफगाणिस्तान) येथील गुरुद्वाराच्या प्रवेशद्वारावर बाँबस्फोट !

कर्ता-ए-परवन गुरुद्वाराच्या प्रवेशद्वारावर करण्यात आलेला बाँबस्फोट

काबूल (अफगाणिस्तान) – येथील कर्ता-ए-परवन गुरुद्वाराच्या प्रवेशद्वारावर बाँबस्फोट करण्यात आला. यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. ‘इंडियन वर्ल्ड फोरम’चे अध्यक्ष पुनीतसिंह चंडोक यांनी ही माहिती दिली. यापूर्वीही या गुरुद्वारावर इस्लामिक स्टेटच्या आतंकवाद्यांनी आक्रमण केले होते. त्यात २ सुरक्षारक्षक ठार झाले होते. त्यापूर्वी वर्ष २०२० मध्ये झालेल्या आक्रमणात २७ शीख ठार झाले होते.

(म्हणे) ‘हिंदु आणि शीख यांनी अफगाणिस्तानमध्ये परतावे !’ – तालिबानचे आवाहन

या आवाहनाला कोण भीक घालणार ? आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतःची प्रतिमा उंचावण्यासाठीच तालिबान अशा प्रकारचे आवाहन करत आहे !

तालिबानने अफगाणिस्तावर नियंत्रण मिळवल्यानंतर तेथील हिंदु आणि शीख यांनी पलायन केले होते. आता तालिबानच्या गृह मंत्रालयाच्या अधिकार्‍यांनी येथील हिंदु आणि शीख नेत्यांना भेटून देशातील सुरक्षेची स्थिती चांगली झाल्याचा दावा करत पलायन केलेल्या त्यांच्या समाजातील नागरिकांना परत बोलावण्याचे आवाहन केले आहे.
२४ जुलै या दिवशी तालिबानी अधिकार्‍यांनी हिंदु आणि शीख परिषदेच्या सदस्यांची भेट घेतली हेती. याविषयी तालिबानचे चीफ ऑफ स्टाफ डॉ. मुल्ला वसी यांच्या कार्यालयाने ट्वीट करून माहिती दिली, तसेच तालिबानने कर्ता-ए-परवाना गुरुद्वारावरील आक्रमणामुळे झालेली हानीभरपाई म्हणून ७५ लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे. याद्वारे गुरुद्वाराचे पुनर्निर्माण केले जाणार आहे.

संपादकीय भूमिका

तालिबानच्या राजवटीत शीख असुरक्षित ! याविषयी खलिस्तानवादी तोंड का उघडत नाहीत ?