आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप !
(चर्चमध्ये वरच्या श्रेणीत कार्यरत असलेल्या पाद्र्यांना ‘बिशप’ म्हणतात.)
थिरूवनंतपूरम् – आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (‘ईडी’ने) ‘चर्च ऑफ साऊथ इंडिया’च्या विविध ठिकाणांवर २५ जुलै या दिवशी धाडी टाकल्यानंतर आता चर्चचे बिशप धर्मराज रसलाम यांना कह्यात घेण्यात आले आहे. ते ब्रिटनला जाण्यासाठी येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोचले असता चौकशीसाठी त्यांना कह्यात घेण्यात आले. (आदल्या दिवशीच ‘ईडी’कडून धाडी टाकल्या गेल्या असतांना बिशप यांनी विदेशगमन करण्याचा प्रयत्न करणे, यामध्ये काहीतरी काळेबेरे आहे, असे कुणी म्हटल्यास चूक ते काय ? – संपादक) चर्चद्वारे संचालित काराकोणम् येथील ‘डॉ. सोमरवेल मेमोरियल सी.एस्.आय. मेडिकल कॉलेज’ला वैद्यकीय पदवी प्रवेशासाठी शुल्क आकारण्याच्या प्रक्रियेत काळ्या पैशांचा संबंध असल्याचा चर्चवर आरोप आहे. यामुळे ‘ईडी’ने बिशप रसलाम, कॉलेजचे अन्य पदाधिकारी यांच्या निवासस्थानांवर धाडी टाकल्या होत्या.
संपादकीय भूमिकाहिंदु संघटनेवर कारवाई झाल्यास हिंदूंच्या विरोधात कंठशोष करणारे आता चर्चसंबंधी अपव्यवहारावरील कारवाईवर गप्प का ? |