९२ युक्रेनी सैनिकांच्या विरोधात गुन्हे निश्‍चित ! – रशियाची अन्वेषण समिती

मॉस्को (रशिया) – रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध चालू होऊन आता ५ मास उलटले आहेत. यातच रशियाने युक्रेनी सैन्याच्या ९२ जणांच्या विरोधात गुन्हे निश्‍चित केले आहेत, अशी माहिती रशियाच्या अन्वेषण समितीचे प्रमुख अ‍ॅलेक्सझँडर बास्त्रीकिन यांनी दिली. युक्रेनच्या विरोधात एकूण १ सहस्र ३०० युद्ध गुन्ह्यांचे अन्वेषण चालू असल्याचेही ते म्हणाले.

त्यांनी रशियाची पारंपरिक मित्र राष्ट्रे इराण, सीरिया आणि बॉलिव्हिया यांचे समर्थन प्राप्त करून एक आंतरराष्ट्रीय न्यायालय स्थापन करण्याचेही प्रतिपादन केले. दुसरीकडे युक्रेननेही रशियन सैन्याने केलेल्या २१ सहस्र युद्ध गुन्ह्यांचे अन्वेषण करत असल्याचे सांगितले आहे.