दक्षिण दिनाजपूर (बंगाल) येथे महिला शिक्षिका मुसलमान विद्यार्थिनीला ओरडल्याने धर्मांधांकडून तिला निर्वस्त्र करून मारहाण !

दक्षिण दिनाजपूर (बंगाल) – येथे महिला शिक्षिका एका मुसलमान विद्यार्थिनीला ओरडल्यामुळे मुसलमानांनी या शिक्षिकेला शाळेत घुसून निर्वस्त्र करून मारहाण केली. त्रिमोहिनी प्रताप चंद्र शाळेत ही घटना घडली. याची माहिती पोलिसांना मिळाल्यावर त्यांनी शाळेत येऊन प्रकरण शांत केले. पोलिसांनी मारहाणीच्या प्रकरणी ४ जणांना अटक केली आहे. तत्पूर्वी पोलिसांनी गुन्हा नोंदवण्यास नकार दिला होता. (एका महिला शिक्षिकेला निर्वस्त्र करून मारहाण करणार्‍यांच्या विरोधात पोलीस गुन्हा नोंदवत नाहीत, हे संतापजनक ! मुसलमानांसमोर नांगी टाकणारे पोलीस हिंदूंसमोर मर्दुमकी गाजवतात, हे लक्षात घ्या ! – संपादक) दुसर्‍या दिवशी स्थानिक हिंदूंनी याविरोधात रस्ता बंद आंदोलन केल्यावर ३५ जणांच्या विरोधात गुन्हा नोंदवून ४ जणांना अटक केली. (हीन कृत्य करणार्‍या मुसलमानांवर कारवाई करण्यास टाळाटाळ करणारे पोलीस वैध मार्गाने निषेध करणार्‍या हिंदूंंवर तत्परतेने कारवाई करतात !  – संपादक)  

संपादकीय भूमिका

तृणमूल काँग्रेसच्या राज्यात याहून वेगळे काय घडणार ?