गडचिरोली – येथे जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत असल्याने १६ जुलैपर्यंत शाळा-महाविद्यालयांना सुटी देण्यात आली आहे. पावसामुळे जिल्ह्यातील १० मार्ग सध्या बंद आहेत. गोसीखुर्द धरणातून ८ सहस्रांहून अधिक क्युसेक्स जलविसर्ग होत असल्याने वैनगंगा नदीकाठच्या गावांना अती सतर्कतेची चेतावणी देण्यात आली आहे. गोसीखुर्द धरणातून १२ सहस्र क्युसेक्स जलविसर्ग करणार असल्याची माहिती जलसंपदा विभागाने गडचिरोली जिल्हा प्रशासनाला दिली आहे.