‘दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’त श्री. पी.टी. राजू यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याचे घोषित केल्यावर कु. मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण !

‘१८.६.२०२२ या दिवशी गोव्यातील श्री रामनाथ देवस्थानात ‘दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’च्या शेवटच्या दिवशी सायंकाळच्या सत्रामध्ये सर्वांना एक आनंदवार्ता समजली. हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी ‘केरळ येथील हिंदुत्वनिष्ठ श्री. पी.टी. राजू यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून ते जन्म-मृत्यूच्या फेर्‍यातून मुक्त झाले’, असे घोषित केले. या प्रसंगाचे देवाच्या कृपेने माझ्याकडून झालेले सूक्ष्म परीक्षण येथे देत आहे.

आध्यात्मिक पातळी घोषित झाल्यानंतरची श्री. पी.टी. राजू यांची एक भावमुद्रा

१. पूर्वसूचना मिळणे

श्री. पी.टी. राजू यांची आध्यात्मिक पातळी घोषित होण्यापूर्वी त्यांचे अधिवेशनातील काही सत्रांमध्ये बोलणे ऐकले होते. ते ऐकत असतांना मला त्यांच्या वाणीमध्ये हिंदु धर्माविषयी अनन्य भाव असल्याचे जाणवले. त्याचप्रमाणे त्यांच्या वाणीतून सात्त्विकता आणि चैतन्य यांचे प्रक्षेपण झाल्यामुळे वायूमंडल अन् श्रोते यांच्या मनावरील रज-तमप्रधान त्रासदायक आवरण नष्ट होऊन त्यांची शुद्धी झाल्याचे जाणवले. त्यामुळे ‘त्यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी प्राप्त केली असेल’, असा विचार माझ्या मनात आला.

२. सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी केरळ येथील हिंदुत्वनिष्ठ श्री. पी.टी. राजू यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून ‘ते जन्म आणि मृत्यू यांच्या फेर्‍यातून मुक्त झाले’, असे घोषित करणे

जेव्हा सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी ‘केरळ येथील हिंदुत्वनिष्ठ श्री. पी.टी. राजू यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून ते जन्म आणि मृत्यू यांच्या फेर्‍यातून मुक्त झाले’, असे घोषित केले, तेव्हा श्री. पी.टी. राजू यांच्या अनाहत चक्राच्या ठिकाणी भावाचे निळसर रंगाचे चक्ररूपी दिव्यकमळ उमलल्याचे दिसले. या कमळाच्या उमललेल्या पाकळ्यांमधून भावाचे निळसर रंगाचे दैवी प्रकाशकिरण वायूमंडलात प्रक्षेपित झाले. तेव्हा श्री. पी.टी. राजू यांच्या साधनेचा प्रवास चांगला चालू असून त्यांची कुंडलिनीशक्ती अनाहतचक्रापर्यंत पोचल्याचे जाणवले.

३. श्री. पी.टी. राजू यांना त्यांच्या आध्यात्मिक उन्नतीविषयी समजल्यावर त्यांचा भावतेज जागृत होणे

कु. मधुरा भोसले

जेव्हा श्री. पी.टी. राजू यांना त्यांच्या आध्यात्मिक उन्नतीविषयी समजले, तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. तेव्हा त्यांच्या मनामध्ये नवरसांपैकी ‘अद्भुत’ हा रस प्रगट झाला आणि त्यानंतर या रसाचे रूपांतर भावरसामध्ये होऊन त्यांच्या मनात परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रतीचा कृतज्ञताभाव जागृत झाला. या भावाचा आवेग इतका होता की, कृतज्ञताभावापोटी त्यांच्या नेत्रांतून भावाश्रू वाहू लागले. त्यांची भावजागृती ५ ते १० मिनिटे सलग होत होती. त्यांची भावजागृती पाहून त्यांच्या हृदयात धर्माप्रती असणारा ‘सेवकभावरूपी’ समष्टी भाव आणि श्रीगुरूंप्रती असणारा ‘शिष्यभावरूपी’ व्यष्टी भाव जाणवत होता. अशा प्रकारे श्री. पी.टी. राजू यांच्यामध्ये व्यष्टी आणि समष्टी अशा दोन्ही प्रकारच्या भावांचा आविष्कार एकाच वेळी झाला. असा योग अत्यंत दुर्लभ असतो, जो आज आम्हाला आद्य शंकराचार्यांच्या केरळ येथील भूमीपुत्र आणि कडवे हिंदुत्वनिष्ठ श्री. पी.टी. राजू यांच्या माध्यमातून अनुभवण्यास मिळाला.

४. कर्नाटक येथील सनातन संस्थेचे धर्मप्रचारक संत पू. रमानंद गौडा यांनी पी.टी. राजू यांना सनातन-निर्मित ‘भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन’ यांचे चित्र भेट दिल्यावर सूक्ष्म स्तरावर घडलेली प्रक्रिया

त्यानंतर कर्नाटक येथील सनातन संस्थेचे धर्मप्रचारक संत पू. रमानंद गौडा यांनी पी.टी. राजू यांना सनातन-निर्मित ‘कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर रथामध्ये आरूढ झालेले भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन’ यांचे चित्र भेट दिले. तेव्हा चित्रातील भगवान श्रीकृष्णाकडून आशीर्वादरूपी पिवळ्या रंगाचे किरण श्री. पी.टी. राजू यांच्याकडे जातांना दिसले. या चित्रामधून प्रक्षेपित झालेल्या चैतन्यामुळे श्री. पी.टी. राजू यांना केरळ येथील अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये हिंदु धर्माचा प्रचार करण्यासाठी दैवी बळ मिळाल्याचे जाणवले. भगवान श्रीकृष्णाच्या कृपेने श्री. पी.टी. राजू यांच्यामध्ये दैवी बळ कार्यरत झाल्यामुळे त्यांच्यामध्ये धर्मतेज आणि क्षात्रतेज यांची वृद्धी झाल्याचे जाणवले. त्यामुळे त्यांच्याकडून धर्मप्रसाराची सेवा भावनेपोटी न होता ‘भगवंताच्या चरणांची सेवा’, या भावाने म्हणजे मानसिक स्तरावर न होता आध्यात्मिक स्तरावर होत आहे. त्यामुळे धर्मप्रसाराच्या सेवेतून शीघ्र आध्यात्मिक उन्नती होऊन त्यांची वाटचाल संतपदाकडे चालू झाल्याचे जाणवले.

५. श्री. पी.टी. राजू यांनी त्यांचे मनोगत व्यक्त करणे

श्री. पी.टी. राजू जेव्हा त्यांचे मनोगत व्यक्त करत होते, तेव्हा त्यांच्या अनाहतचक्रातून कृतज्ञताभावाचे निळसर, त्यांच्या आज्ञाचक्रातून धर्मतेजाचे भगवे आणि त्यांच्या सहस्रारचक्रातून चैतन्याचे पिवळसर रंगाचे दैवी प्रकाशकिरण वातावरणात प्रक्षेपित झाले. त्यामुळे त्यांचे मनोगत ऐकत असतांना सर्वांचा हिंदु धर्माप्रतीचा सेवाभाव, परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रतीचा कृतज्ञताभाव आणि ईश्वराप्रतीचा जिज्ञासाभाव जागृत झाला. त्यांचे मनोगत अत्यंत भावपूर्ण आणि हृदयस्पर्शी होते.

६. श्री. पी.टी. राजू यांच्यातील विविध योगमार्गांनुसार असणारी आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये

७. भगवंताने श्री. पी.टी. राजू यांना त्यांचा हिंदु धर्माप्रती असणारा त्याग आणि समर्पणभाव पाहून त्यांना जन्म अन् मृत्यू यांच्या फेर्‍यातून मुक्त करून त्यांना आध्यात्मिक उन्नतीची भेट दिलेली असणे

श्री. पी.टी. राजू यांनी अनेक वर्षे धर्मसेवा करत असतांना तन, मन, धन, बुद्धी आणि सर्वस्व यांचा पुष्कळ त्याग केला. त्यांच्या त्यागी वृत्तीमुळे त्यांची साधना एखाद्या तपस्वी ऋषींप्रमाणे झालेली आहे.

७ अ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या धर्मसंस्थापनेच्या कार्यात सहभागी होण्यासाठी श्री. पी.टी. राजू यांचा ५०० वर्षांनंतर प्रखर धर्मप्रेमी संतांच्या रूपाने भारतात पुन्हा जन्म होणार असणे : अशा प्रकारे भगवंताने श्री. पी.टी. राजू यांचा हिंदु धर्माप्रती असणारा त्याग आणि समर्पणभाव पाहून त्यांना जन्म अन् मृत्यू यांच्या फेर्‍यातून मुक्त करून त्यांना आध्यात्मिक उन्नतीची भेट दिली. असे जरी असले, तरी अजून ५०० वर्षांनंतर जेव्हा परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा धर्मराज्याची धुरा सांभाळण्यासाठी पृथ्वीवर पुन्हा मनुष्यरूपात जन्म होणार आहे, तेव्हा परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या धर्मसंस्थापनेच्या कार्यात सहभागी होऊन खारीचा वाटा उचलण्यासाठी श्री. पी.टी. राजू यांचाही प्रखर धर्मप्रेमी संतांच्या रूपाने भारतात पुन्हा जन्म होणार आहे. या जन्मात त्यांची उर्वरित साधना होऊन त्यांना सद्गुरुपद आणि परात्पर गुरुपद प्राप्त होऊन शेवटी मोक्षपद मिळणार आहे. ५०० वर्षांनंतर श्रीविष्णूचे अवतार परात्पर गुरु डॉ. आठवले पृथ्वीवर जन्माला येणार आहेत. तेव्हा विष्णुलोकातील त्यांचे भक्तही पृथ्वीवर जन्माला येऊन त्यांच्या अवतारी कार्यात सहभागी होणार आहेत. असे प्रत्येक अवताराच्या वेळी घडते. याला ‘अवतारासह ‘व्यूह’ पृथ्वीवर अवतरणे’, असे म्हणतात.

श्रीगुरुचरणी कृतज्ञता आणि प्रार्थना : श्रीगुरूंच्या कृपेमुळे केरळ येथील भगवंताचे अनन्य भक्त श्री. पी.टी. राजू यांच्या आध्यात्मिक उन्नतीच्या सोहळ्यात सहभागी होऊन हा दिव्य सोहळा अनुभवण्याची संधी मिळाली. त्याचप्रमाणे ‘श्री. पी.टी. राजू यांच्याकडून अनेक गुण शिकता आले’, यासाठी मी श्री गुरूंच्या चरणी कोटीश: कृतज्ञता व्यक्त करते. ‘श्री. पी.टी. राजू यांच्यासारखा समर्पणभाव आणि त्यागी वृत्ती आमच्यामध्ये निर्माण होऊ दे’, हीच श्री गुरूंच्या चरणी विनम्र प्रार्थना आहे.’

– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान, आध्यात्मिक पातळी ६४ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (६.७.२०२२)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात.