शिष्यास गुरुत्व प्राप्त होये । सुवर्णे सुवर्ण करिता न ये ।
म्हणोनी उपमा न साहे । सद्गुरूसी परिसाची ॥
– समर्थ रामदासस्वामी, दासबोध (दशक १, समास ४)
अर्थ : परिसाच्या स्पर्शाने लोखंडाचे सोने होते; पण ते सोने आपल्या स्पर्शाने लोखंडाला सोने बनवू शकत नाही; मात्र गुरु हे शिष्याला ‘गुरुपद’ प्राप्त करून देतात; म्हणून परिसाची उपमा गुरूंना लागू पडत नाही.