मथुरेत मंदिराच्या भूमीवर मजार, तहसीलदारांसह २३ जणांविरुद्ध गुन्हा नोंद

(मजार म्हणजे इस्लामी पीर किंवा फकीर यांची समाधी)

१८ वर्षांपूर्वीचा प्रकार उघडकीस

प्रतिकात्मक छायाचित्र

मथुरा (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेशच्या मथुरेतील शाहपूरमध्ये मंदिराच्या भूमीवर मजार (इस्लामी पीर किंवा फकीर यांची समाधी) बांधण्याचे प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणी तहसीलदारांसह २३ जणांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

१८ वर्षांपूर्वी स्थानिक समाजवादी पक्षाचा नेता भोला खान याने लेखापाल आणि महसूल निरीक्षक यांना हाताशी धरून ‘बिहारी महाराज सेवा ट्रस्ट’च्या भूमीवर असलेल्या मंदिरावर नियंत्रण मिळवले आणि तहसील कार्यालयातील कागदपत्रांमध्ये फेरफार करून त्यांवर ‘स्मशानभूमी’ अशी नोंद केल्याचा आरोप आहे. पुढे १५ मार्च २०२० या दिवशी मुसलमानांनी मंदिरातील सिंहासन तोडले आणि त्यावर मजार बांधली.

पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी केली असता तत्कालीन तहसीलदार, लेखापाल, महसूल निरीक्षक, ग्रामप्रमुख इत्यादींसह २३ जणांविरुद्ध गुन्हा नोंद करून अन्वेषण चालू केले आहे.

संपादकीय भूमिका

इतके होईपर्यंत प्रशासन झोपले होते का ? यास उत्तरदायी असलेल्या अधिकार्‍यांना कारागृहात पाठवले पाहिजे !