भारतीय संशोधकांना सापडला डासांना मारणारा विषाणू !

पुद्दुचेरी – येथील ‘भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदे’च्या (‘आय.सी.एम्.आर्.’च्या) संशोधन केंद्रात करण्यात आलेल्या संशोधनातून डासांना मारणार्‍या विषाणूच्या एका प्रजातीचा शोध लावण्यात आला आहे. हा विषाणू इतर कोणत्याही प्राण्याला इजा न पोचवता डास आणि काळ्या माश्यांची अंडी नष्ट करतो. ‘बीटीआय’ असे या विषाणूच्या प्रजातीचे नाव आहे. डास मारण्यासाठी हा विषाणू अनेक वर्षांपासून वापरला जात आहे.