• मायेत राहून अध्यात्म जगायला शिकवणारे माझे प.पू. डॉक्टर !
• सर्व साधकांच्या हृदयात वसलेले माझे प.पू. डॉक्टर !
• दगडाचे रूपांतर मोत्यात करणारे माझे प.पू. डॉक्टर !
• दगडालाही (भक्तीने) रडवणारे माझे प.पू. डॉक्टर !
• दगडातूनही देव साकारणारे माझे प.पू. डॉक्टर !
• सुखातून आनंदाकडे नेणारे माझे प.पू. डॉक्टर !
• अंधःकारातून प्रकाशाकडे नेणारे माझे प.पू. डॉक्टर !
• खोलीत असतांना बाहेरही दिसणारे माझे प.पू. डॉक्टर !
• एकटे वाटत असतांना हळूच येऊन मला हाक मारणारे माझे प.पू. डॉक्टर !
• स्थूलदेहाने दूर असूनही सूक्ष्मरूपाने माझ्या अगदी जवळ असलेले माझे प.पू. डॉक्टर !
• दुःखाश्रूंना भावाश्रूंमध्ये रूपांतरित करणारे माझे प.पू. डॉक्टर !
• दोष आणि अहं रूपी उन्हात मायेची सावली देणारे माझे प.पू. डॉक्टर !
• विरोधकांनी मारलेल्या दगडांतूनही किल्ला उभारणारे माझे प.पू. डॉक्टर !
• क्षणोक्षणी देवता आणि संत यांचे दर्शन घडवणारे माझे प.पू. डॉक्टर !
• श्रीकृष्णालाही हेवा वाटेल, असे माझे प्रेमळ प.पू. डॉक्टर !
• संपूर्ण ब्रह्मांडात व्यापलेले माझे प.पू. डॉक्टर !
• अनेक जन्मांपासून सोबत असलेले माझे दोष आणि अहं क्षणात नष्ट करणारे माझे प.पू. डॉक्टर !
• दुःखाचे डोंगर उभे असतांना त्यांच्या मोहक हास्याने क्षणात सर्व दुःख भुईसपाट करणारे माझे प.पू. डॉक्टर !
टीप : प.पू. डॉक्टर – परात्पर गुरु डॉ. आठवले
या भावप्रयोगामुळे साधकांमध्ये भाव निर्माण करून त्यातील आनंद मला आणि साधकांनाही मिळाला, यासाठी कोटी कोटी कृतज्ञता !’
– सौ. आरती पुराणिक, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
|