नेहमीच्या कृती करतांना भाव ठेवल्यावर तशा प्रकारच्या अनुभूतीही येणे !

सौ. अनघा जोशी

‘आश्रमातील पाणी पितांना ‘प.पू. डॉक्टरांच्या चरणांचे तीर्थ घेत आहे’, चहा घेतांना ‘प.पू. डॉक्टरांच्या चरणांचे तीर्थ घेत आहे’, तोंड धुतांनाही ‘प.पू. डॉक्टरांच्या चरणांचे तीर्थ लावत आहे’, असा भाव ठेवला. त्यामुळे शरिरात चैतन्य पसरत असल्याचे जाणवते. मी प.पू. डॉक्टरांना प्रार्थना करते, ‘श्वासागणिक मला नामजपाची आठवण करून द्या.’ तेव्हा नामजपाची सातत्याने आठवण होत असल्याचे माझ्या लक्षात आले.

– सौ. अनघा जोशी, (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के) सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक