उमेश कोल्हे हत्या प्रकरणी आतंकवादी संघटना ‘आय.एस्’ गटाचा हात असल्याचा संशय !

अमरावती येथील ७ आरोपींना एन्.आय.ए.ची कोठडी !

अमरावती – येथील औषध विक्रेते उमेश कोल्हे यांच्या हत्येमागे आंतरराष्ट्रीय आतंकवादी संघटना ‘इस्लामिक स्टेट ऑफ सिरिया’च्या (आय.एस्.) समर्थक गटाचा हात असल्याचा संशय आहे. ७ जुलै या दिवशी या प्रकरणातील ७ आरोपींना मुंबई येथील राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या (एन्.आय.ए.) विशेष न्यायालयाने १५ जुलैपर्यंत ‘एन्.आय.ए.’ची कोठडी सुनावली आहे.

‘कोल्हे यांच्या हत्येची पद्धत पाहून आक्रमणकर्ते ‘इस्लामिक स्टेट’च्या प्रभावाखाली असल्याचे दिसते. यामुळेच ‘इस्लामिक स्टेट’सह इतर एखाद्या आतंकवादी संघटनेशी त्यांचे लागेबांधे आहेत का ? याचे अन्वेषण चालू आहे’, असे एका अन्वेषण अधिकाऱ्याने सांगितले.