नूपुर शर्मा यांचे समर्थन करणार्‍या १० जणांना ठार मारण्याची धमकी !

अकोला, अमरावती आणि नागपूर येथे गुन्ह्यांची नोंद !

नूपुर शर्मा

नागपूर – भाजपच्या माजी प्रवक्त्या नूपुर शर्मा यांच्या समर्थनार्थ अनेकांनी समाजमाध्यमांवर माहिती दिली होती. अशी माहिती देणार्‍यांना विशिष्ट समुदायाकडून ठार मारण्याच्या धमक्या मिळत आहेत. या प्रकरणी विदर्भातील अंदाजे १० जणांनी पोलीस ठाण्यांत तक्रारी प्रविष्ट केल्या आहेत. नूपुर शर्मा यांच्या समर्थनार्थ अनेकांनी ‘फेसबूक’, ‘ट्विटर’, ‘इंस्टाग्राम’ आणि ‘व्हॉट्सॲप’ यांवरून नूपुर शर्मा यांना प्रोत्साहन देणारे संदेश पाठवून मोहीम चालवली.

१. अकोला येथील एका व्यावसायिकाला मारहाण करण्यात आली. या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट करण्यात आली आहे.

२. अमरावती येथील काही जणांना धमकी दिल्याने तेथील पोलीस ठाण्यांत काही युवकांवर गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.

३. शहरातील लकडगंज येथे एका युवकाने नूपुर शर्मा यांच्या समर्थनार्थ माहिती दिल्यानंतर त्याला काही युवकांनी ठार मारण्याची धमकी दिली होती.

. नूपुर शर्मा समर्थक असलेल्या कामठी येथील एक तरुणी आणि तरुण यांनी ट्विटरवर आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे तणाव निर्माण झाला. कामठी येथील दोन्ही पोलीस ठाण्यांना नागरिकांनी घेराव घालत त्या दोघांना अटक करण्याची मागणी केली. शेवटी कामठी पोलीस ठाण्यात एका तरुणीसह तिघांवर गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.