(म्हणे) ‘नूपुर शर्मा यांचे समर्थन करणार्‍या अजमेर दर्ग्याजवळील हिंदु दुकानदारांना विरोध केला पाहिजे !’

अजमेर दर्ग्याचे संचलन करणार्‍या अंजुमन कमिटीचे सचिव सरवर चिश्ती यांचे मुसलमानांना चिथावणीखोर आवाहन !

अंजुमन कमिटीचे सचिव सरवर चिश्ती

अजमेर (राजस्थान) – हिंदु समाजातील लोकांची येथील मोईनुद्दीन चिश्ती दर्ग्याजवळ दुकाने आहेत. ते दर्ग्यामध्ये येणार्‍या भाविकांकडून कमाई करून खातात (उदरनिर्वाह करतात); मात्र दुसरीकडे नूपुर शर्मा यांचा समर्थन करून आमच्या जखमेवर मीठ चोळतात. आम्ही नूपुर शर्मा यांना विरोध करतो, तर हे तिचे समर्थन करतात. हे आम्ही सहन करून शकत नाही. त्यांना विरोध केला पाहिजे, असे चिथावणीखोर आवाहन या दर्ग्याचे संचलन करणार्‍या अंजुमन कमिटीचे सचिव सरवर चिश्ती यांनी दर्ग्याच्या बाहेर उभे राहून केलेे. या आवाहनाचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे. त्यांनी ‘आम्ही पैगंबर यांच्या अवमानाच्या विरोधात असे आंदोलन करू की संपूर्ण भारत हालेल’, अशी धमकीही या व्हिडिओत दिली आहे. या प्रकरणी पोलीस चौकशी करत आहेत. याविषयी सरवर चिश्ती यांनी नंतर प्रसारमाध्यमांना सांगितले की, नूपुर शर्मा यांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. आंदोलन करणे आमचा घटनात्मक अधिकार आहे. पंतप्रधान मोदीही याविषयी काही बोलत नाही.

संपादकीय भूमिका 

  • कर्नाटकमध्ये हिंदूंनी त्यांच्या मंदिरांच्या ठिकाणी मुसलमानांना दुकाने थाटण्यास विरोध केल्यावर मुसलमान न्यायालयात गेले आणि हा निर्णय पालटण्यास भाग पाडले. असे एकीकडे असतांना दुसरीकडे मात्र मुसलमान हिंदूंना अशा प्रकारे विरोध करतात, हे हिंदूंनी लक्षात घ्यावे !

  • अशा प्रकारचे आवाहन करणार्‍या सरवर चिश्ती यांच्या विरोधात राजस्थानमधील काँग्रेस सरकार कारवाई करण्याची शक्यता अल्प आहे. त्यामुळे याविरोधात हिंदूंनीही न्यायालयाचे दार ठोठावले पाहिजे !