पाकमध्ये बकरी ईदच्या दिवशी क्रेनच्या साहाय्याने गायीला उचलून खाली फेकून मारण्याची क्रूर कुप्रथा !

इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकिस्तानमध्ये बकरी ईदच्या वेळी क्रेनच्या साहाय्याने गायींना वर उचलून त्यांना खाली आपटले जाते. असे केल्याने त्यांची हाडे मोडून त्यांचा मृत्यू होतो. गेल्या अनेक वर्षांपासून पाकमध्ये ही कुप्रथा चालू आहे. ही घटना पहाण्यासाठी मोठ्या संख्येने मुसलमान गोळा होतात. या संदर्भात ‘रॉयटर्स’ या वृत्तसंस्थेने विशेष वृत्त प्रसारित केले आहे. तसेच अशा घटनेचा व्हिडिओही बनवला आहे. या वृत्तात कुठेही या कुप्रथेविषयी भाष्य करण्यात आलेले नाही किंवा त्याला चुकीचे म्हटले नाही. (विदेशी प्रसारमाध्यमांचे विकृतप्रेम ! अशा वृत्तसंस्थांवर भारतात बंदीच घातली पाहिजे ! – संपादक) सामाजिक माध्यमांतून या संदर्भात ‘प्राण्यांच्या रक्षणासाठी काम करणारी ‘पेटा’ संस्था काय करत आहे ?’ असे प्रश्‍न विचारले जात आहेत.

(ही छायाचित्रे / व्हिडिओ देण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा आमचा उद्देश नसून सर्वांना वस्तूस्थिती कळावी, या उद्देशाने हे प्रसिद्ध केले आहेत. – संपादक)

संपादकीय भूमिका

याविषयी आंतरराष्ट्रीय संघटना, प्राणीप्रेमी संघटना गप्प का ? बकरी ईदला गायीची हत्या करण्याची इस्लाममध्ये कोणतही प्रथा नसतांना अशा प्रकारे करण्यात येणारी हत्या इस्लामचा अवमान नाही का ?