गुना (मध्यप्रदेश) येथे भूमीच्या वादातून आदिवासी महिलेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न

गुना (मध्यप्रदेश) – येथील धनोरिया गावातील एका आदिवासी महिलेला भूमीच्या वादातून काही लोकांनी जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. यात ही महिला ७० टक्के भाजली. तिला उपचारार्थ भोपाळ येथील रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

या प्रकरणी पोलिसांनी दोघा जणांना अटक केली असून पसार असणार्‍या अन्य तिघांचा शोध घेण्यात येत आहे.