देवाला ओळखण्यासाठी प्रार्थनेची आवश्यकता !

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ

देवापुढे विनम्र होऊन इच्छित गोष्ट तळमळीने मागणे, याला ‘प्रार्थना’ म्हणतात. प्रार्थनेत आदर, प्रेम, विनवणी, श्रद्धा आणि भक्तीभाव या गोष्टी अंतर्भूत आहेत. प्रार्थना करतांना भक्ताची असमर्थता, तसेच शरणागती व्यक्त होत असते अन् तो कर्तेपण ईश्वराला देत असतो.

देवाला ओळखण्यासाठी, तसेच त्याच्या अस्तित्वाची देह, मन आणि बुद्धी यांना जाणीव होण्यासाठी प्रार्थनेची आवश्यकता असते. साधनेत शीघ्र आध्यात्मिक प्रगती साधायची असेल, तर प्रार्थनेत सातत्य ठेवणे, हे आपले प्रमुख साध्य हवे.

– श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ (४.५.२०११)