‘आयुर्वेद’ या भारतीय वैद्यकशास्त्राचे महत्त्व पाश्चात्त्यांना समजले आहे; म्हणून ते आयुर्वेदीय औषधांचे ‘पेटंट’ घेऊ पहातात. दुर्दैवाने भारतियांना आयुर्वेदाचे महत्त्व वाटत नाही ! ‘ॲलोपॅथी’त नव्हे, तर आयुर्वेदात रोग मुळापासून नष्ट करण्याची क्षमता आहे. यासाठी आयुर्वेद अनुसरा ! या ग्रंथमालिकेच्या अंतर्गत आतापर्यंत पुढील ग्रंथ प्रकाशित झाले आहेत.
१. आयुर्वेदाची मूलतत्त्वे (वात-पित्त-कफ, प्रकृती आदींचे विवेचन !)
२. विकार आणि उपचार यांविषयी मूलभूत आयुर्वेदीय दृष्टीकोन
३. आयुर्वेदानुसार दिनचर्येतील सकाळी उठण्यापासून व्यायामापर्यंतच्या कृती
४. आयुर्वेदानुसार दिनचर्येतील स्नानापासून झोपेपर्यंतच्या कृती आणि ऋतूचर्या
५. आहारशास्त्राची मूलतत्त्वे (आहाराविषयी आयुर्वेदीय आणि आध्यात्मिक दृष्टीकोन !)
६. योग्य आहाराविषयी आधुनिक दृष्टीकोन
७. धान्ये, डाळी, भाज्या, फळे आणि मसाले यांचे औषधी गुणधर्म
८. दुधाचे पदार्थ, सुकामेवा, तेल आदींचे औषधी गुणधर्म
९. आयुर्वेदीय औषधांचे गुणधर्म आणि औषधनिर्मिती
१०. ११६ वनस्पतींचे औषधी गुणधर्म
११. ९५ वनस्पतींचे औषधी गुणधर्म
१२. भस्मे, रसायने, क्षार, मूत्र आदींचे औषधी गुणधर्म
१३. निद्रानाश, डोकेदुखी, मूर्च्छा आदी विकारांवर आयुर्वेदीय उपचार
१४. आकडी, अर्धांगवात, पांगळेपणा आदी विकारांवर आयुर्वेदीय उपचार
१५. छातीत दुखणे, हृदयरोग आदी विकारांवर आयुर्वेदीय उपचार
१६. रक्तदाबादी विकारांवर आयुर्वेदीय उपचार (हृदयरोग्यांसाठीच्या दिनचर्येसह)
१७. नाक, घसा अन् स्वरयंत्र यांच्या विकारांवर आयुर्वेदीय उपचार
१८. खोकला, क्षय, दमा, उचकी आदी विकारांवर आयुर्वेदीय उपचार
१९. अपचन, उलटी, पोटदुखी आदींवर आयुर्वेदीय उपचार
२०. आव, बद्धकोष्ठता, मूळव्याध, जंत आदींवर आयुर्वेदीय उपचार
२१. रक्त आणि यकृत यांच्या विकारांवर आयुर्वेदीय उपचार
२२. मूत्रवहनसंस्थेच्या विकारांवर आयुर्वेदीय उपचार